आयटी कंपनी Cognizant भारतातील 28 हजार जणांना नोकरी देणार, फ्रेशर्सना मोठी संधी

कॉग्निझंट (Cognizant) भारतातील 28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. Cognizant IT freshers India

आयटी कंपनी Cognizant भारतातील 28 हजार जणांना नोकरी देणार, फ्रेशर्सना मोठी संधी
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 12:31 PM

नवी दिल्ली: आघाडीची आयटी कंपनी कॉग्निझंट (Cognizant) भारतातील 28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फराईस यांनी ही घोषणा केली आहे. कॉग्निझंट कंपनीनं 2020 मध्ये भारतातील 17 हजार फ्रेशर्सना नोकरी दिली आहे. कॉग्निझंट कंपनीचे भारतात एकऊण 2 लाख 96 हजार 500 कर्मचारी आहेत.(Cognizant IT company will hire 28 thousand freshers in India this year)

28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार

कॉग्निझंट या कंपनीनं येत्या वर्षभरात देशातील 28 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. फ्रेशर्सची निवड वेगवान होण्यासाठी आम्ही अतिरिक्त मनुष्यबळ वापरणार आहोत, असं ब्रायन हम्फराईस यांनी सांगितलं आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

कॉग्निझंट कंपनीच्यावतीनं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध मार्ग अंवलंबले जाणार आहेत. अधिक लोकांना नोकरी देण्यासोबतच त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यक्रम होती घेण्यात येणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना प्रमोशन आणि पगारामध्ये वाढ देण्यात येईल, असं कॉग्निझंटच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

विप्रो कंपनीही पूर्वीच्या तुलनेत जास्त नोकरभरती करणार

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, विप्रो कंपनीही पूर्वीच्या तुलनेत जास्त नोकरभरती करणार आहे. नोकरभरतीची संख्या कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल आणि टेक महिंद्रा यंदा 1,10,000 हून अधिक भरती करणार आहेत, याच कंपन्यांनी गेल्या वर्षी 90000 पेक्षा जास्त भरती केली आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम हलविण्याची तयारी

कोरोना साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशातील कामकाजाचा दिनक्रम बदलला आहे. गेल्या वर्षापासून बहुतांश कंपन्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. कोरोना काळानुसार वाढती मागणी पाहता बर्‍याच कंपन्या आणि ग्राहक आपला व्यवसाय ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हलविण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या

सेवा क्षेत्राची गती मंदावली, कर्मचारी भरती थांबली!

Job Vacancy | ‘या’ कंपनीच्या महसुलात मोठी वाढ, आगामी काळात 20 हजार जणांना नोकरी देणार

(Cognizant IT company will hire 28 thousand freshers in India this year)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.