Job Vacancy | ‘या’ कंपनीच्या महसुलात मोठी वाढ, आगामी काळात 20 हजार जणांना नोकरी देणार

महसूल वाढ आणि आकाळात या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार आहे. (hcl will hire employees)

Job Vacancy | 'या' कंपनीच्या महसुलात मोठी वाढ, आगामी काळात 20 हजार जणांना नोकरी देणार
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 10:58 AM

मुंबई : लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याही (HCL Technology) महसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि  या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार आहे. (hcl is going to hire near about 20000 employees in coming months)

HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ

मागील तिमाहीत HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. या कंनीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झालीये. कंपनीने सांगितल्यानुसार हा नफा 3982 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलात 6.4 टक्क्यांनीव वाढ जाली असून हा महसूल 19302 कोटी रुपये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आगामी काळात या कंपनीकडून 20 हजार नवे रोजगार दिले जातील, असं एका अधिकाऱ्यांने सांगितलंय.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय कुमार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मागील काही महिन्यांमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. तसेच, लोकांचे डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन HCL Technology आगामी काळात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीत 1,59,682 कर्मचारी कामावर होते. मागील तिमाहीमध्ये आम्ही एकून 12,422 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात अनेकांनी राजीनामे दिले. त्यामुळे पुढच्या 4 ते 6 महिन्यांत 20 हजार जणांना काम देणार आहेत.” यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तसेच अनुभवी लोकांची निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 26.7 टक्के नफा

लॉकडाऊन असल्यामुळे  सर्व व्यवहार ठप्प पडले होते. मात्र आता सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे HCL Technology कंनीच्या नफ्यामध्येसुद्धा चांगली वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात HCL Technology या कपंनीला 26.7 टक्के जास्त फायदा झाल्याचं या कंपनीने सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

JOBS | ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया!

Job Vacancy : महाराष्ट्र मेट्रोमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक पदांवर भरती, 1.25 लाखांपर्यंत असेल पगार

खुशखबर! 12538 जागांसाठी पोलीस भरती! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु!

(hcl is going to hire near about 20000 employees in coming months)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.