JOBS | ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया!

इंडियन एअरफोर्सच्या वतीने या भरतीद्वारे एअरमन ग्रुप, संगीतकार, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, इंडियन एअरफोर्स पोलीस यासह अनेक पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

JOBS | ‘इंडियन एअर फोर्स’ अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया!

मुंबई : भारतीय वायुसेनेत अर्थात इंडियन एअर फोर्समध्ये (Indian Air Force) अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. वायुसेनेने एअरमन एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठीचे अर्ज 22 जानेवारीपासून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरले जाणार आहेत. तर, अर्ज करण्याची शेवटची संधी 7 फेब्रुवारी 2021पर्यंत उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांचा संच तयार करावा. त्यामुळे फॉर्म भरताना दस्तऐवजाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही (Indian Air Force recruitment 2021 for X and Y group vacancy).

इंडियन एअरफोर्सच्या वतीने या भरतीद्वारे एअरमन ग्रुप, संगीतकार, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, इंडियन एअरफोर्स पोलीस यासह अनेक पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. या विषयीची अधिक माहिती भारतीय वायू दलाच्या https://afcat.cdac.in/AFCAT/  या अधिकृत वेबसाईटवर मिळवता येईल.

आवश्यक असणारी कागदपत्रे :

1- हायस्कूल मार्कशीट

2- इंटर मार्कशीट

3- जन्म दाखला

4- अधिवास / पत्ता प्रमाणपत्र

5- एनसीसी प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)

6- आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड  (या ओळखपत्रांपैकी एक)

7- जातीचे प्रमाणपत्र (लागू होत असल्यास)

7- स्वातंत्र्य सैनिक (FF) श्रेणीचे प्रमाणपत्र (जर आपण त्या श्रेणीमध्ये मोडत असल्यास)

महत्त्वाच्या तारखा :

1- 22 जानेवारी 2021 पासून ऑनलाईन अर्ज भरले जातील.

2- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे.

3- ऑनलाईन परीक्षा 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे.

(Indian Air Force recruitment 2021 for X and Y group vacancy)

शैक्षणिक पात्रता :

बारावी उत्तीर्ण असणारे सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र, बारावीत त्यांना किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिक माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मिळवू शकतात.

वय मर्यादा :

या पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याबाबतची अधिक माहिती मिळवू शकतील.

निवड प्रक्रिया :

वायू दलाच्या या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी व कागदपत्र पडताळणीनंतर होईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन एअर फोर्सच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

(Indian Air Force recruitment 2021 for X and Y group vacancy)

हेही वाचा :