AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशातील नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, पहिली रँक मिळवून झाले IAS Officer!

यांचे UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी आणि उत्तीर्ण होण्यावर इतके लक्ष होते की त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये त्यांनी या परीक्षेत अखिल भारतीय रँक मिळवला आणि IAS अधिकारी बनले.

परदेशातील नोकरी सोडून केली UPSC ची तयारी, पहिली रँक मिळवून झाले IAS Officer!
IAS Kanishka Kataria
| Updated on: Jul 02, 2023 | 11:41 AM
Share

मुंबई: IIT मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले IAS अधिकारी कनिष्क कटारिया यांचा UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS Officer होण्याचा प्रवास इतका प्रेरणादायी आहे की आजच्या काळात या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतात. IAS कनिष्क कटारिया यांचे UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी आणि उत्तीर्ण होण्यावर इतके लक्ष होते की त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये त्यांनी या परीक्षेत अखिल भारतीय रँक मिळवला आणि IAS अधिकारी बनले.

IAS  कनिष्क कटारिया हे राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कोटा येथील सेंट पॉल वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून झाले. कनिष्क अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी  IIT JEE 2010 मध्ये 44 वा क्रमांक मिळवला. कॉम्प्युटर सायन्समधील B.Tech आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक्सचा मायनर कोर्स पूर्ण करण्यासाठी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे गेले.

कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षांनी ते भारतात परतले आणि बेंगळुरू येथील एका अमेरिकन स्टार्टअपमध्ये रुजू झाले. कनिष्क कटारिया या नोकरीतून खूप चांगला पगार मिळवत होते, पण त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

कनिष्कने काही महिने दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये यूपीएससीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर सेल्फ स्टडीसाठी कोटा येथे गेले. त्यांनी २०१९ मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवला आणि त्यांना त्यांचे मेहनतीचे फळ मिळाले. कनिष्क कटारिया यूपीएससी टॉपर बनून आयएएस अधिकारी बनला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.