Indian Army Agniveer Recruitment: लष्करात आजपासून मिशन ‘अग्निपथ’, अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी, असा करा अर्ज

| Updated on: Jul 01, 2022 | 4:57 PM

Indian Army Agniveer:अग्निपथ योजनेतून लष्करात उमंद करिअर घडविण्याची अभूतपूर्व संधी युवकांना आजपासून उपलब्ध झाली आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. आर्मीमध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.

Indian Army Agniveer Recruitment: लष्करात आजपासून मिशन अग्निपथ, अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी, असा करा अर्ज
लष्करात अग्निवीर नोंदणी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Indian Army Agniveer: भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे. यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला. आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे. लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल. हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील. चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल. त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.

आजपासून online Registration

अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती. अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

हे सुद्धा वाचा

असा करा अर्ज

अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील. ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल. 16ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

या पदांचा समावेश

या योजनेतंर्गत तरुणांना 4 वर्षांकरीता प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवरी टेक्निकल(एव्हिएशन/म्युनिशन एक्झामिनर), लिपिक, भांडारपाल आणि इतर पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर पात्र उमेदवारांना शारिरीक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलविण्यात येईल. हा टप्पा पार पाडल्यानंतर त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. अर्ज करणा-या उमेदवारांचे वय 17.5 ते 23 वर्षा दरम्यान असावे.