Territorial Army Officer Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत भरती प्रक्रिया सुरु, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

| Updated on: Jul 20, 2021 | 11:27 AM

भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे.

Territorial Army Officer Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत भरती प्रक्रिया सुरु, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021: भारतीय सैन्यदलात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे. भारतीय सेना दलाचा भाग असलेल्या प्रादेशिक सेनेतील अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार 19 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. jointerritorialarmy.gov.in या वेबसाईटवर उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात 20 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 19 ऑगस्ट 2021
अर्जाच शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख 19 ऑगस्ट 2021
लेखी परीक्षेची तारीख: 25 सप्टेंबर 2021

वेतन

प्रादेशिक आर्मीनं जारी केलेल्या नोटीसमध्ये वेतनाबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 पर्यंत मिळू शकते.

पात्रता आणि वयोमर्यादा

प्रादेशिक सेनेमध्ये अर्ज करणारे उमेदवार भारत सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 वर्ष ते 42 वर्ष यादरम्यान असणं आवश्यक आहे. उमदेवारांचं वय 19 ऑगस्ट 2021 या दिनांकापासून ग्राह्य धरलं जाईल.

अर्ज शुल्क

जे उमेदवार प्रादेशिक सेनेमध्ये अर्ज करु इच्छितात त्यांना अर्जाच शुल्क 200 रुपये जमा करावं लागेल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करावं लागेल.

निवड प्रक्रिया

प्रादेशिक सेनेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत याद्वारे केली जाईल.

महिला लष्करी पोलिसात 100 सैनिकांच्या पदांसाठी भरती

भारतीय सैन्य दलाने नुकतीच महिला सैन्य पोलिसात सैनिक (सामान्य कर्तव्य) या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अधिसूचनेनुसार, सैन्यात महिला पोलिसात 100 सैनिक जीडी पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जून 2021 पासून सुरू केली गेली होती आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 20 जुलै 2021 आहे. इच्छुक उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते भारतीय लष्कराच्या भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरती अधिसूचना तपासू शकतात आणि थेट ऑनलाईन अर्ज पृष्ठावर पोहोचू शकतात.

इतर बातम्या:

Women Military Police Application 2021: महिला लष्करी पोलिसात 100 सैनिकांच्या पदांसाठी भरती, आज अर्जाचा शेवटचा दिवस

ICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील

Indian Army Recruitment 2021 Territorial Army Officer Vacancy know details govt job news