Women Military Police Application 2021: महिला लष्करी पोलिसात 100 सैनिकांच्या पदांसाठी भरती, आज अर्जाचा शेवटचा दिवस

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरती अधिसूचना तपासू शकतात आणि थेट ऑनलाईन अर्ज पृष्ठावर पोहोचू शकतात.

Women Military Police Application 2021: महिला लष्करी पोलिसात 100 सैनिकांच्या पदांसाठी भरती, आज अर्जाचा शेवटचा दिवस
संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

नवी दिल्ली : Women Military Police Application 2021: भारतीय सैन्य दलाने नुकतीच महिला सैन्य पोलिसात सैनिक (सामान्य कर्तव्य) या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अधिसूचनेनुसार, सैन्यात महिला पोलिसात 100 सैनिक जीडी पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जून 2021 पासून सुरू केली गेली होती आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 20 जुलै 2021 आहे. इच्छुक उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते भारतीय लष्कराच्या भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून भरती अधिसूचना तपासू शकतात आणि थेट ऑनलाईन अर्ज पृष्ठावर पोहोचू शकतात.

कोण अर्ज करू शकेल?

भारतीय सैन्य महिला सैनिक भरती 2020 च्या अधिसूचनेनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळामधून दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिलीय. तसेच उमेदवारांनी सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण मिळवलेत. उमेदवारांचे वय 17.5 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 पूर्वी झाला नव्हता आणि 1 एप्रिल 2004 नंतरचा नसावा. या व्यतिरिक्त उमेदवाराची उंची किमान 152 सेमी आणि वजन उंचीनुसार असावी.

‘या’ जिल्ह्यात भरती मेळावा होणार

महिला सैन्य पोलिसात सैनिक जीडीच्या पदांसाठी सैन्याच्या भरती अधिसूचनेनुसार या पदांवर नियुक्तीसाठी असणाऱ्या उमेदवारांची निवड भरती रॅलीद्वारे केली जाणार आहे. या रॅलीचे आयोजन लखनऊ, अंबाला, जबलपूर, बेळगाव, पुणे आणि शिलाँग येथे होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या भरती मेळाव्याच्या ठिकाणी तसेच सैन्यातर्फे देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातून तारीख आणि वेळ याची माहिती दिली जाईल.

संबंधित बातम्या

ICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील

दहावी नंतरच्या सैन्यदलातील करिअर संधी: स्टाफ सिलेक्शन जनरल ड्युटी कॉन्स्टेबल भरती

Women Military Police Application 2021: Recruitment for 100 Soldiers in Women Military Police, 20 th july 2021 is the last day of application