ICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील

आयसीएआर(ICAR)ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मान्यता प्राप्त संस्थांकडून बीकॉम किंवा बीबीए किंवा बीबीएस, सीए इंटर किंवा आयसीडब्ल्यूए इंटर किंवा सीएस इंटर असणे आवश्यक आहे. यात (ICAR Recruitment 2021) अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळवावे लागतील.

ICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील
आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील

ICAR Recruitment 2021 नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) यंग प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर केली आहे. आयसीएआर अंतर्गत एकूण 14 पदे भरली जातील. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी आधिकृत संकेतस्थळ icar.org.in जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. आयसीएआर(ICAR)ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मान्यता प्राप्त संस्थांकडून बीकॉम किंवा बीबीए किंवा बीबीएस, सीए इंटर किंवा आयसीडब्ल्यूए इंटर किंवा सीएस इंटर असणे आवश्यक आहे. यात (ICAR Recruitment 2021) अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान 60 टक्के गुण मिळवावे लागतील. तसेच उमेदवाराला किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना तपासा. रिक्त स्थानाबद्दलची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच या पदांसाठी अर्ज करा. (Recruitment for the post of Young Professional in ICAR, see details here)

वयोमर्यादा

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) जारी केलेल्या या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे असावे. तसेच आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार उच्च वयोमर्यादेत शिथिलता मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै आहे. शेवटची तारीख झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करताना काळजीपूर्वक सूचना वाचणे देखील महत्त्वाचे आहे. काहीही चुकीचे आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. या व्यतिरिक्त अर्जदारांनी अर्ज करताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचली पाहिजे कारण त्यात काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

लेखी परीक्षेद्वारे होईल निवड

आयसीएआर(ICAR)ने भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. आवश्यक असल्यास शॉर्टलिस्टेड उमेदवारांना पॅनेल मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ icar.org.in वर एक अधिसूचना पोस्ट केली गेली आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना पहा. (Recruitment for the post of Young Professional in ICAR, see details here)

इतर बातम्या

पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीतील दोन गटात समेट, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी एकदिलाने काम करणार

फडणवीसांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजेनचं किट बनावट, आदिवासी विकासमंत्र्यांचा दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI