फडणवीसांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजेनचं किट बनावट, आदिवासी विकासमंत्र्यांचा दावा

खावटी अनुदान योजनेतून आदिवासींना अतिश्य निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही खाद्यपदार्थही दाखवले होते. फडणवीसांच्या याच आरोपाला आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजेनचं किट बनावट, आदिवासी विकासमंत्र्यांचा दावा
देवेंद्र फडणवीस, के. सी. पाडवी

नंदूरबार : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या राड्यानंतर 12 भाजप आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं विधानसभेबाहेरच प्रति विधानसभा भररवली. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागावर जोरदार टीका केली होती. खावटी अनुदान योजनेतून आदिवासींना अतिश्य निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही खाद्यपदार्थही दाखवले होते. फडणवीसांच्या याच आरोपाला आता आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाडवी यांच्या हस्ते आज नंदूरबार जिल्ह्यात खावटी अनुदान योजने अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किटचं वाटप करण्यात आलं. (Tribal Development Minister K. C. Padvi’s reply to Devendra Fadnavis)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजनेचे किट बनावट असल्याचा दावा के. सी. पाडवी यांनी केलाय. बाजारातून सुटे तेल आणि माल खरेदी करुन तो माध्यमांसमोर दाखवल्याचा गंभीर आरोप पाडवी यांनी फडणवीसांवर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून चांगलं काम होत असल्यामुळे आदिवासी खातं आणि आपल्याला बदनाम करण्याचा हा कट असल्याचंही पाडवी यांनी म्हटलंय. भाजपच्या काळात या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपण तोंड उघडल्यास भाजपला महाग पडेल, असा इशाराही पाडवी यांनी फडणवीसांनी दिला आहे.

फडणवीस यांचा आरोप काय?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार राडा झाला होता. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. याचा निषेध म्हणून भाजपनं विधानसभेच्या बाहेरच प्रति विधानसभा भरवली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावेळी फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या खावटी अनुदान योजनेतील घोटाळ्यावर बोट ठेवलं होतं. या योजनेतून आदिवसांना देण्यात येणाऱ्या वस्तू अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी काही वस्तूही दाखवल्या होत्या.

इतर बातम्या :

संजय राठोड मंत्रिपदासाठी ‘प्रचंड आशावादी’, अजूनही म्हणतात, ‘मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील!’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधींचा विसर?

Tribal Development Minister K. C. Padvi’s reply to Devendra Fadnavis

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI