राज्यात ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्याचा घाट?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

निलेश डाहाट

| Edited By: |

Updated on: Jul 02, 2021 | 2:20 PM

विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (devendra fadnavis)

राज्यात ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्याचा घाट?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Follow us on

चंद्रपूर: विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. (devendra fadnavis reaction on ED’s action on maharashtra leader)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी मूल येथे आज आले होते. परत जाताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राऊतांना जेवणच पचत नाही

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत भाजपवर रोज काही ना काही आरोप करत असतात. त्यांना भाजपवर आरोप केल्याशिवाय जेवणच पचत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

त्या निर्णयाचं स्वागत

राज्य सरकारने इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचे काम ओबीसी आयोगाला दिलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संबंधाने राज्याची याचिका कायम असून हा प्रश्न मागासवर्ग आयोगाकडे द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मुश्रीफ यांचा फडणवीसांवर टीका

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठीची केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकारच उरला नसल्याचं आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

अधिवेशनात ठराव आणणार

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळून लावली आहे. राज्याला आरक्षण टिकवता आलं नाही असं म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल करतानाच हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?, असा सवालही त्यांनी केला. इम्पिरीकल डाटा मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. (devendra fadnavis reaction on ED’s action on maharashtra leader)

संबंधित बातम्या:

मोदी सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं चार ओळीत निकालात काढली, काय म्हणालं कोर्ट नेमकं?

मराठा आरक्षणाचा उरलेला एकमेव मार्ग कोणता? आता चेंडू मोदी सरकारच्या कोर्टात? वाचा कोर्ट काय म्हणालं होतं?

मराठा आरक्षणावरचे 5 मोठे मुद्दे जे सुप्रीम कोर्टानं निकाली काढले, जसेच्या तसे

(devendra fadnavis reaction on ED’s action on maharashtra leader)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI