…और लोग पुछते है, दुख काहे खतम नहीं होता! पाहिली का ही रिक्त पदांची संख्या, शासनाने लक्ष द्यायची गरज 

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.

...और लोग पुछते है, दुख काहे खतम नहीं होता! पाहिली का ही रिक्त पदांची संख्या, शासनाने लक्ष द्यायची गरज 
मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 4:47 PM

मुंबई : महाराष्ट्र (Mahrashtra) राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) राज्य सरकारचे विविध विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेने 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते (Right To Information Activist) अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाने ही माहिती दिली आहे. अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे 11 मे 2022 रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांस गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली.

एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10, 70,840 इतकी आहे. ज्यापैकी 8,26,435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 1 लाख 92 हजार 425 तर जिल्हा परिषदेच्या 51 हजार 980 अशी एकूण 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत.

विभागाचं नाव – मंजूर पदे – त्यापैकी रिक्त पदे

  1. गृह विभाग- मंजूर पदे 2,92,820 – त्यापैकी रिक्त पदे 46,851
  2. सार्वजनिक आरोग्य विभाग- मंजूर पदे 62,358 – त्यापैकी रिक्त पदे 23,112
  3. हे सुद्धा वाचा
  4. जलसंपदा विभाग- मंजूर पदे 45,217 -त्यापैकी रिक्त पदे 21,489
  5. महसूल व वन विभाग- मंजूर पदे 69,584 – त्यापैकी रिक्त पदे 12,557
  6. उच्च व तंत्र विभाग- मंजूर पदे 12,407 – त्यापैकी रिक्त पदे 3,995
  7. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग- मंजूर पदे 36,956 – त्यापैकी रिक्त पदे 124,23
  8. आदिवासी विकास विभाग- एकूण मंजूर पदे 21,154 – त्यापैकी रिक्त पदे 6213
  9. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग- एकूण मंजूर पदे 7,050 – त्यापैकी रिक्त पदे 3828
  10. सार्वजनिक बांधकाम विभाग- एकूण मंजूर पदे 21,649 – त्यापैकी रिक्त पदे 7751
  11. सहकार पणन विभाग- एकूण मंजूर पदे 8,867- त्यापैकी रिक्त पदे 2933
  12. सामाजिक न्याय विभाग- एकूण मंजूर पदे 6573 – त्यापैकी रिक्त पदे 3221
  13. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- एकूण मंजूर पदे 8197 – त्यापैकी रिक्त पदे 3686
  14. वैद्यकीय शिक्षण विभाग- एकूण मंजूर पदे 36956 – त्यापैकी रिक्त पदे 12423
  15. वित्त विभाग- एकूण मंजूर पदे 18191 – त्यापैकी रिक्त पदे 5719
  16. शालेय शिक्षण विभाग- एकूण मंजूर पदे 7,050 – त्यापैकी रिक्त पदे 3828
  17. अन्न व नागरी पुरवठा विभाग- एकूण मंजूर पदे 8,308 – त्यापैकी रिक्त पदे 2949
  18. महिला व बालविकास विभाग- एकूण मंजूर पदे 3936- त्यापैकी रिक्त पदे 1451
  19. विधि व न्याय विभाग- एकूण मंजूर पदे 2938 – त्यापैकी रिक्त पदे 1201
  20. पर्यटन व सांस्कृतिक विभाग- एकूण मंजूर पदे 735 – त्यापैकी रिक्त पदे 386
  21. सामान्य प्रशासन विभाग- एकूण मंजूर पदे 8795 – त्यापैकी रिक्त पदे 2325

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक

अनिल गलगली यांच्या मते रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात रिक्त पदांची संख्या अधिक आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त असल्याची खंत अनिल गलगली यांनी व्यक्त करत केली आहे की शासनाने तत्काळ ही रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.