AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DRDO Recruitment 2022: कायच ती खास बातमी, परीक्षा न देताच मिळणार नोकरी ! DRDO मध्ये सुवर्णसंधी

डीआरडीओ रिसर्च असोसिएट या पदाची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवार वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात.

DRDO Recruitment 2022: कायच ती खास बातमी, परीक्षा न देताच मिळणार नोकरी ! DRDO मध्ये सुवर्णसंधी
परीक्षा न देताच मिळणार नोकरी ! Image Credit source: Twitter
| Updated on: May 25, 2022 | 1:29 PM
Share

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर रिसर्च असोसिएट (Research Associate) पदासाठी अर्ज मागवले आहेत. डीआरडीओ रिसर्च असोसिएट या पदाची निवड इंटरव्ह्यूच्या (Interview) आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवार वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात. 13 जून, 14 जून आणि 15 जून 2022 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी डिफेन्स लॅबोरेटरी, रतनदा पॅलेस, जोधपूर-342 011 (राजस्थान) इथे जावं लागेल. या पदासाठी उमेदवाराला रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / मटेरियल सायन्स मध्ये पीएचडी किंवा समतुल्य पदवी किंवा तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास या क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार एचआरए आणि वैद्यकीय सुविधांसह दरमहा 54,000 रुपये पगार मिळेल. या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा (मुलाखतीच्या तारखेनुसार) कमीत कमी 35 वर्षे आहे. त्याचबरोबर वयाच्या अटीत एससी /एसटी / पीएचसाठी 5 वर्षांपर्यंत आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंतच्या वयात सूट देण्यात आली आहे.

डीआरडीओ भरती 2022

  • पदाचे नाव – डीआरडीओ रिसर्च असोसिएट
  • रिसर्च असोसिएट पदासाठी जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागा 3 आहेत.
  • फेलोशिपचा कालावधी : 2 वर्षे
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार एचआरए आणि वैद्यकीय सुविधांसह दरमहा 54,000 रुपये पगार मिळेल
  • अधिकृत वेबसाईट-  Click Here

मुलाखतीचे ठिकाण

13 जून, 14 जून आणि 15 जून 2022 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी डिफेन्स लॅबोरेटरी, रतनदा पॅलेस, जोधपूर-342 011 (राजस्थान) इथे जावं लागेल.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता

रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / मटेरियल सायन्स मध्ये पीएचडी किंवा समतुल्य पदवी किंवा तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास या क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं

वयाची अट

  • या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा (मुलाखतीच्या तारखेनुसार) कमीत कमी ३५ वर्षे आहे. त्याचबरोबर वयाच्या अटीत एससी /एसटी / पीएचसाठी 5 वर्षांपर्यंत आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंतच्या वयात सूट देण्यात आली आहे.
  • एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मूळ जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

मुलाखतीला कधी कुठे ? कोणती कागदपत्रं आवश्यक ? वाचा

  • पात्र उमेदवाराने “वर नमूद केलेल्या तारखेला 10:00 वाजता डिफेन्स लॅबोरेटरी, रतनाडा पॅलेस, जोधपूर -342 011 (राजस्थान) येथे मुलाखतीसाठी हजर राहावे”.
  • मुलाखतीसाठी उपस्थित असताना, उमेदवारांनी अलीकडील पासपोर्ट फोटोसह संपूर्ण बायो-डेटा आणि सर्व पदवी / शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे / गुणपत्रक / अनुभव प्रमाणपत्र इत्यादींच्या स्वयं-साक्षांकित प्रतींचा एक संच सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांना वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाशी संबंधित मूळ प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती आहे. सरकारी / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्वायत्त संस्थांमध्ये काम करणार् या उमेदवारांनी सध्याच्या नियोक्त्याने जारी केलेली एनओसी मुलाखतीला येताना आणावेत.

टीप – इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी कृपया DRDO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.