AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat High Court: अय केम छो पब्लिक? गुजरातमध्ये डायरेक्ट हाय कोर्टात नोकरीची संधी, जायचं मजामा राहायचं !

ही भरती असेल आणि त्यानंतर सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये स्टेनोग्राफी चाचणी/कौशल्य चाचणी घेण्यात येईल आणि नोव्हेंबर /डिसेंबर, 2022 रोजी तोंडी मुलाखत घेण्यात येईल. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग कौशल्य आणि संगणक परिचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

Gujarat High Court: अय केम छो पब्लिक? गुजरातमध्ये डायरेक्ट हाय कोर्टात नोकरीची संधी, जायचं मजामा राहायचं !
गुजरात उच्च न्यायालयImage Credit source: Twitter
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 25, 2022 | 11:55 AM
Share

नवी दिल्ली : गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) खासगी सचिव (Private Secretaries) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या पदासाठी १५ जागा रिक्त आहेत. नियमानुसार अधिक भत्त्यासह 44,900-1,42,400 रुपये वेतन असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे, असे गुजरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत पोर्टलने म्हटले आहे. जुलै/ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या प्राथमिक चाचणी (Objective Type MCQ) वर आधारित ही भरती असेल आणि त्यानंतर सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये स्टेनोग्राफी चाचणी/कौशल्य चाचणी घेण्यात येईल आणि नोव्हेंबर /डिसेंबर, 2022 रोजी तोंडी मुलाखत घेण्यात येईल. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग कौशल्य आणि संगणक परिचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकाच्या मूलभूत ज्ञानाबाबत उमेदवाराकडे राज्य सरकारचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांचे वय 31 मे 2022 पर्यंत 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी, एसटी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, पीएच, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गुजरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

  1. पदाचे नाव – खासगी सचिव (Private Secretary)
  2. अर्ज – ऑनलाईन
  3. वेतन – 44,900-1,42,400 रुपये
  4. रिक्त जागा – 15
  5. अधिकृत वेबसाईट – Click Here
  6. शेवटची तारीख- 31 मे 2022

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी
  • इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग येणं आवश्यक
  • संगणकाच्या मूलभूत ज्ञानाबाबत उमेदवाराकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

अर्जदारांचे वय

  • 18- 35 वर्षे
  • एससी (SC), एसटी (ST), एसईबीसी (SEBC), ईडब्ल्यूएस (EWS), पीएच, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट

निवड प्रक्रिया

  • जुलै/ऑगस्ट 2022 – प्राथमिक चाचणी (ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यूज)
  • सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 – स्टेनोग्राफी चाचणी / कौशल्य चाचणी होईल
  • नोव्हेंबर/डिसेंबर 2022 – तोंडी मुलाखत

टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी गुजरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला Click Here भेट द्यावी.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?