AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO Recruitment 2021 : फायरमॅन ​​आणि लॅब टेक्निशियन पदासाठी नोकरीची संधी, लवकरच करा अर्ज

या भरतीअंतर्गत (ISRO Recruitment 2021) 13 पदांवर भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवार व्हीएसएसओच्या अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Job Opportunity for Fireman and Lab Technician Post in ISRO, Apply on vssc.gov.in)

ISRO Recruitment 2021 : फायरमॅन ​​आणि लॅब टेक्निशियन पदासाठी नोकरीची संधी, लवकरच करा अर्ज
| Updated on: Mar 22, 2021 | 8:30 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि विक्रम सरायभाई अवकाश संस्था (VSSC) यांच्या तर्फे अग्निशमन दल जवानांसह अनेक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. या भरतीअंतर्गत (ISRO Recruitment 2021) 13 पदांवर भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवार व्हीएसएसओच्या अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 5 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर अर्जाची लिंक वेबसाईटवरून काढण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली नमूद केलेली माहिती पुन्हा तपासून पहावी. तसेच अधिकृत सूचना तपासल्याशिवाय अर्ज करू नका. (Job Opportunity for Fireman and Lab Technician Post in ISRO, Apply on vssc.gov.in)

ISRO Recruitment 2021 साठी असा करा अर्ज

या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाईन मोडमध्ये स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा. – सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जा. – येथे होम पेज पर ‘ADVERTISEMENT NO. VSSC-315 DATED 20.03.2021 INVITES APPLICATION FOR THE FOLLOWING POSTS’ च्या लिंक वर क्लिक करा. – आता अधिकृत नोटिफिकेशन दिसेल. – यात “CLICK HERE TO APPLY” वर क्लिक करा. – आता सर्वात आधी REGISTRATION फॉर्म भरा. – यानंतर अॅप्लीकेशन फॉर्म भरू शकता. – अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट काढा.

पात्रता

या भरतीद्वारे फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन आणि फायरमॅन ​​या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात फार्मासिस्टची 3 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व फार्मसी इन पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे. याशिवाय लॅब टेक्निशियनच्या 2 जागांवर भरती होणार आहे. यातही उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी पदवी पदविका असणे आवश्यक आहे.

अग्निशमन दलाच्या 8 जागांवर भरती होईल. यात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसह शारीरिक पात्रतादेखील पाहिली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रासह, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी आणि महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी. त्याच वेळी, पुरुष उमेदवाराची छाती 81 ते 86 सेमी असावी. आपण अधिकृत अधिसूचनेमध्ये पात्रतेबद्दल पूर्ण माहिती पाहू शकता. (Job Opportunity for Fireman and Lab Technician Post in ISRO, Apply on vssc.gov.in)

इतर बातम्या

प्रवाशाच्या केसांना हात लावला अन् सोनं पडायला लागलं, जाणून घ्या नेमका प्रकार काय?

चांगली बातमी! होळीच्या आधीच सोने स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा दर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...