MPSC : एमपीएससीकडून पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) शासनाच्या कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी (Live Stock Development Officer) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

MPSC : एमपीएससीकडून पशुधन विकास अधिकारी पदाच्या 212 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 1:04 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) शासनाच्या कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी (Live Stock Development Officer) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी हे पद गट अ संवर्गातील आहे. या पदाच्या 212 जागांसाठी भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर यासंबंधी सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. पशुधन विकास अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र (MPSC) राज्याचा रहिवासी असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतो. अर्ज दाखल झाल्यानंतर आयोगाकडून चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचणं आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

पशुधन विकास अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसवंर्धन या विषयातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 15 फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 7 मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 294 रुपये शुल्क भरावं लागेल. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं किंवा स्टेट बँकेत चलनद्वारे भरायचे आहेत.

निवड प्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुधन विकास अधिकारी पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षा घेतल्यानंतर आयोगातर्फे मुलाखतीसाठी उमदेवारांना बोलावण्यात येईल. मुलाखतीमध्ये 41 टक्केपेक्षा अधिक गुण मिळणवाऱ्या उमदेवारांची संबंधित विभागाकडे शिफारस करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमदेवारांना 56 हजार रुपये ते 1 लाख 77 हजार रुपये वेतन दिलं जाईल.

आयोगाचं ट्विट

दुय्यम सेवा परीक्षेत 419 पदांची वाढ, 1085 जागांसाठी भरती

एमपीएससी गट ब अराजपत्रित 2021 सेवा परीक्षेद्वारे आता 1085 पदांची भरती होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशी पद या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. एकूण 419 पदांसाठी अतिरिक्त मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झालं असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विट द्वारे कळवण्यात आलं आहे. या आधी 666 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता 419 जागा वाढल्यानं 1085 पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

शाळेतील गीता पठणावरून वाद, भाजपच्या मागणीला समाजवादी पार्टीचा तीव्र विरोध; महापौरांना लिहिलं पत्रं

Indian Navy : भारतीय नौदलात ट्रेडसमनच्या 1531 पदांवर बंपर भरती, 63 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार