AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Navy : भारतीय नौदलात ट्रेडसमनच्या 1531 पदांवर बंपर भरती, 63 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी (Job) करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये ट्रेडसमनपदासाठी (Tradesman) 1531 जागांवर भरती होणार आहे.

Indian Navy : भारतीय नौदलात ट्रेडसमनच्या 1531 पदांवर बंपर भरती, 63 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
Indian Navy प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 18, 2022 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी (Job) करण्याची तुमची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. भारतीय नौदलामध्ये ट्रेडसमनपदासाठी (Tradesman) 1531 जागांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत 20 मार्च 2022 निश्चित करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतेलेले उमेदवार अर्ज करु शकतात. भारतीय नावल डॉकयार्डच्या स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी देखील अर्ज दाखल करु शकतात. उमेदवार 21 फेब्रुवारीपासून https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र आणि शैक्षणिक माहिती सोबत ठेवावी. भारतीय नौदलातील या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणं आवश्यक आहे.

पदांची संख्या

भारतीय नौदलाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 1531 पदांवर भरती होणार आहे. इंडियन नेव्हीमध्ये ट्रेडसमनमध्ये विविध पदांवर भरती केली जाईल. इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाऊंड्री, पॅटर्न मेकर, आयीसीई फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशिनिस्ट, मिलराईट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, ट्रेलर, वेल्डर, रडार फिटर, रेडिओ फिटर, रिगर, शिपराईट, ब्लॅकस्मिथ, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, जायरो फिटर, मशिनिरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, आयसीईटी फिटर क्रेन या पदांसाठी भरती करण्याती येणार आहे.

अर्ज कसा दाखल करायचा

स्टेप 1 : जॉऊन इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट द्या. स्टेप 2 : वेबसाईटवरील करियर अँड जॉब्स ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप 3 :आता ट्रेडसमन भरती ऑप्शन वर क्लिक करा. स्टेप 4 : तिथे Register with Aadhaar Virtual ID वर क्लिक करा. स्टेप 5 : आता नोंदणीमधील सर्व माहिती भरा. स्टेप 6 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज दाखल करा. स्टेप 7 : जॉईन इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा.

वयोमर्यादा नेमकी किती?

भारतीय नौदलातालील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराचं वय 18 ते 25 च्या दरम्यान असावं.

निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

वेतन किती मिळणार?

भारतीय नौदलाता ट्रेडसमन पदासाठी 19,000 ते 63,000 रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी पासून भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.

इतर बातम्या :

गिअरच्या झंझटपासून सुटका, या स्वस्तातील कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत पोरीला नांदवायला घेऊन गेलेल्या बापाचा सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?