Pimpri Chinchwad crime | पिंपरीत पोरीला नांदवायला घेऊन गेलेल्या बापाचा सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू

सासरच्या लोकांना मजून सांगून पुन्हा नांदायला लावू या उद्देशाने वडील मुलीला घेऊन सासरी घेऊन गेले. त्यानंतर वडील तिथे गेले असताना पुन्हा सासरच्या मंडळींनी वादावादी करत भांडणं सुरु केली. बहीणच्या सासराच्या मंडळीने बहिणीसह वडिलांना मारहाण केली. त्यात वडिलांच्या डोक्याला जबर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत पोरीला नांदवायला घेऊन गेलेल्या बापाचा सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 11:50 AM

पिंपरी – सासरच्या मंडळींकडून लेकीचा होणार छळ थांबावा. लेकीला सुखानं सासरी नांदवावे.या हेतूने मुलीला सासरी सोडायला गेलेल्या बापाचा(father) सासरच्यांनी केलेल्या मारहाणी मृत्यू (death)झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील(Pimpri Chinchwad)  थेरगाव येथील जय मल्हार नगर येथे ही घटना घडली आहे. यामध्ये पिंपरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वडिलांचे नाव शिवाजी बाबुराव पाडुळे(65) असे आहे. याबाबत त्यांच्या मुलीने थेरगाव पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची बहीण रत्न धर्मे यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर सासऱ्यांच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सततच्या छळ कंटाळून बहीण माहेरी आली होती. सासरच्या लोकांना मजून सांगून पुन्हा नांदायला लावू या उद्देशाने वडील मुलीला घेऊन सासरी घेऊन गेले. त्यानंतर वडील तिथे गेले असताना पुन्हा सासरच्या मंडळींनी वादावादी करत भांडणं सुरु केली. बहीणच्या सासराच्या मंडळीने बहिणीसह वडिलांना मारहाण केली. त्यात वडिलांच्या डोक्याला जबर मार लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत सहाजणांना अटक केली आहे. अजिनाथ धर्में , सुमन धर्मे , रंजना पाडुळे , मंगेश पाडुळे यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे.

औरंगाबाद शिवजयंती | दोन दिवस क्रांती चौकातील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर

शिवसेना-नारायण राणे वादाचा नवा अंक, BMC ची राणेंना नोटीस, अधिश बंगल्याची पाहणी करणार

MP Dr. Amol Kolhe| ‘बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस’, खासदार कोल्हेंना मित्राच्या आईची प्रेमळ तंबी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.