MP Dr. Amol Kolhe| ‘बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस’, खासदार कोल्हेंना मित्राच्या आईची प्रेमळ तंबी

प्राजक्ता ढेकळे

|

Updated on: Feb 18, 2022 | 11:14 AM

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना निमगाव दावडीच्या घाटात बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसण्याचे आव्हान दिले होते. या ठिकाणी उपस्थित राहत अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सत्यातही उतरवले. अमोल कोल्हे बुधवारी बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाले अन उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला.

MP Dr. Amol Kolhe|  'बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस', खासदार कोल्हेंना मित्राच्या आईची प्रेमळ तंबी
MP Dr. amol kolhe

पुणे – जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीत (Bullock cart race)घोडीवर ‘स्वार होत, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी (MP Dr. Amol Kolhe) पाळला. जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमींच्या आनंदाला उधाण आले होते. उपस्थितीत जनसमुदायामध्ये देशातील खासदार आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून सहभागी झाल्याची भावना होती. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीनंतर अमोल कोल्हे  शेखरदादा पाचुंदकर या निकटवर्ती यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्या मातोश्रींनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची दृष्ट काढत परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली दिली. स्वतः अमोल कोल्हे यांनी  आपल्या  ट्विटर(Twitter) अकाऊंटवरून  ट्विट करत ही माहिती दिली आहे.

शेखरदादा पाचुंदकर यांच्या मातोश्रींनी  दृष्ट काढली

अन उपस्थितांनी एकच जल्लोष केला

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना निमगाव दावडीच्या घाटात बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसण्याचे आव्हान दिले होते. या ठिकाणी उपस्थित राहत अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सत्यातही उतरवले. अमोल कोल्हे बुधवारी बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’ झाले अन उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यटनास चालना मिळेल

ग्रामीण बैलगाडा शर्यत हा केवळ शेतकऱ्यांचा नाद न राहता, केवळ मनोरंजन न राहता ग्रामीण संस्कृती आणि पर्यटनास चालना मिळेल असे चित्र भावी काळात दिसण्यासाठी बैलगाडा शर्यतींचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी यावेळी केले. दरम्यान, निमगाव खंडोबा येथे माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या खंडोबाच्या यात्रेत लाखो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. तर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर घाटात नवसाचे बैलगाडे घाटात पळविण्यात आले.   बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी यात्रेत सहभाग घेतला.

रशिया आज हल्ला करणार? काय घडतंय यूक्रेनच्या युद्धभूमीत? समजून घ्या 20 फोटोंच्या माध्यमातून

The Kapil Sharma Show: कपिल शर्माने श्रीराम नेनेंवर केला विनोद, माधुरीची अशी रिअॅक्शन; व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

शेतकऱ्यांनो सावधान! वेळेत शेतसारा अदा करा अन्यथा सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासनाचे’ नाव, काय आहे नेमके प्रकरण?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI