MPSC Update : PSI पदाची पुणे कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी आणि मुलाखत लांबणीवर, उमदेवारांमध्ये संभ्रम

| Updated on: Nov 20, 2021 | 2:10 PM

19 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी होणारी शारीरिक चाचणी आणि मुलाखत प्रक्रिया प्रशासकीय कारणामुळं लांबणीवर टाकण्यात आली आहे.

MPSC Update : PSI पदाची पुणे कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी आणि मुलाखत लांबणीवर, उमदेवारांमध्ये संभ्रम
MPSC EXAM
Follow us on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 19 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी होणारी शारीरिक चाचणी आणि मुलाखत प्रक्रिया प्रशासकीय कारणामुळं लांबणीवर टाकण्यात आली आहे. आयोगानं या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तर, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम लांबणीवर पडल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आयोगानं पुणे, नाशिक आणि कोल्हापर या तीन केंद्रांवर ही प्रक्रिया आयोजित केली होती. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. तेव्हापासून उमेदवार मुलाखत आणि शारीरिक चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत.

उमेदवारांमध्ये संभ्रम

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलल्याचं आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर केंद्राच्या पुढे ढकलण्यात आल्यात. तर, काल पुणे केंद्रावरील चाचण्या पुढे ढकलल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. शारीरिक चाचणी आणि मुलाखत पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

पुणे केंद्रांवरील प्रक्रिया पुढे ढकलल्याचं ट्विट

दोन वर्षांपासून प्रक्रिया लांबली

2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीकडील इतर कारणांमुळं ही भरती प्रक्रिया लांबत चाललीय.

496 पदांसाठी भरती

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 496 जागांसाठी ही प्रक्रिया सुरु आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावरील पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी नव्यानं तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

कोल्हापूर केंद्रांवरील प्रक्रिया पुढे ढकलल्याचं ट्विट

इतर बातम्या:

MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या अंतिम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांचा आक्षेप, गौताळा राष्ट्रीय उद्यान नसून अभयारण्य असल्याचा दावा

MPSC च्या राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण 416 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देणार, दत्तात्रय भरणेंची माहिती

Maharashtra Public Service Commission postpone dates PSI Physical Test and Interview Programme