MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या अंतिम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांचा आक्षेप, गौताळा राष्ट्रीय उद्यान नसून अभयारण्य असल्याचा दावा

एमपीएससी कडून संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अराजपत्रित गट ब च्या उत्तरतालिकेत चुकीचं उत्तर देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एमपीएससीनं घेतलेल्या पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती.

MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या अंतिम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांचा आक्षेप, गौताळा राष्ट्रीय उद्यान नसून अभयारण्य असल्याचा दावा
एमपीएससी


पुणे: एमपीएससी कडून संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अराजपत्रित गट ब च्या उत्तरतालिकेत चुकीचं उत्तर देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एमपीएससीनं घेतलेल्या पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा 4 सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र, त्याचा विचार करण्यात न आल्याचा दावा विद्यार्थ्यांचा आहे.

कोणत्या प्रश्नासंदर्भात वाद?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 4 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिका कोड अ मधील प्रश्न क्रमांक 27 बद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप आहे. आयोगानं विचारलेल्या प्रश्नात चूक असल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असल्यानं त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात आयोगानं अंतिम उत्तर तालिकेत कोणताही बदल केला नसल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे. आयोगानं 27 व्या प्रश्नात 4 विधानं दिली होती. त्यापैकी गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, असं विधान त्यामध्ये होतं. विद्यार्थ्यांचा या विधानावर आक्षेप आहे. गौताळा राष्ट्रीय अभयारण्य असून ते उद्यान नसल्याचं विद्यार्थ्यांनी आयोगाला कळवलं होतं. मात्र त्याचा विचार करण्यात आलेला नाही. हे विधान प्रश्न विचारण्यात आलेलं विधान योग्य ग्राह्य धरल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

MPSC issue

याच प्रश्नावर विद्यार्थ्यांचा आक्षेप

आयोग चुकीची उत्तर प्रसिद्ध करत असल्याचा आरोप

परीक्षा घेतल्यानंतर हरकती मागवल्या जातात आणि मगच उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाते. मात्र, आता विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तक्रार करूनही उत्तरतालिकेत बदल होणार नसल्याचं आयोगाचं म्हणणं आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. एक एक मार्क विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असताना आयोगचं चुकीची उत्तर प्रसिद्ध करतंय, असा आरोप विद्यार्थी करत आहेत. आयोगानं प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तरतालिकेत बदल करण्याची मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे.

इतर बातम्या:

MPSC चा धडाका सुरुच, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, औषध निरीक्षक पदाच्या 87 जागांसाठी जाहिरात

MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा

Pune MPSC aspirants claim Maharashtra Public Service Commission declared wrong final answer key of Combined Secondary exam

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI