AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brother Alliance : KDMC पाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेने उद्धव ठाकरे यांना दिला अजून एक मोठा झटका

Thackeray Brother Alliance : कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून मनसेने त्यांना पाठिंबा दिला. आता राज्यातील आणखी एका महापालिकेत असच घडतय. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का आहे. कारण मनसेने त्यांच्यासोबत विरोधी बाकावर बसणं अपेक्षित होतं.

Thackeray Brother Alliance : KDMC पाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेने उद्धव ठाकरे यांना दिला अजून एक मोठा झटका
Raj Thackeray-Uddhav Thackeray
| Updated on: Feb 06, 2026 | 11:43 AM
Share

मागच्या महिन्यात महापालिका निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर आठवड्याभराच्या आतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. विकासाच्या मुद्यावर आम्ही पाठिंबा देतोय असं मनसेकडून सांगण्यात आलं. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर ठाकरे बंधुंच्या युतीवर लगेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ही युती पुढेही अबाधित राहणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन डॅमेज कंट्रोल केलं. नाईलाजाने मनसेला हे पाऊल उचलावं लागलं असं संजय राऊत यांचं म्हणणं होतं. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेने उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे.

नाशिक महानगरपालिकेत मनसे सत्तेमध्ये सहभागी होणार आहे. महत्वाचं म्हणजे मनसेचा फक्त एक नगरसेवक निवडून आलाय. तरी त्यांना सत्तेत वाटा मिळणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मनसेला सत्तेत सहभागी करुन घेणार आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे. कारण मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एकत्र निवडणूक लढवली होती. मागच्या महिन्यात लागलेल्या निवडणूक निकालानुसार, भाजप नाशिकमध्ये मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी 72 जागांवर विजय मिळवला. त्या पाठोपाठ शिंदे गट शिवसेनेला 26 जागा मिळाल्या. शिवसेना (उबाठा) 15 जागा, काँग्रेसला 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि मनसे 1 आणि अपक्ष उमेदवार 1 जागेवर विजयी ठरला.

वरून जसे आदेश येतात तसे कार्य करतो

मनसेच्या नगरसेविका मयुरी पवार म्हणाल्या की, “आम्हाला वरून जसे आदेश येतात तसे कार्य करतो. शिंदे सेनेसोबत जाण्याचे सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. सत्तेमध्ये विकासासाठी सामील झालो आहोत”

आम्ही दोन्ही बहिणी सर्व नगरसेवकांच्या पाठिशी

“आज माझी आई नाही. पण माझ्या दोन बहिणी आहेत. बहिणी पाठीशी आहेत” असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास शिंदे म्हणाले. “खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही दोन्ही बहिणी सर्व नगरसेवकांच्या पाठिशी आहोत. सर्वांनी निवडणूक संपल्यानंतर एकत्र आलं पाहिजे. आम्ही देखील या महापालिकेत नगरसेवक राहिलेलो आहोत” असं आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?