Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये 565 पदांवर बंपर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील 565 जांगासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. तर, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क 15 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार जमा करु शकतात.

Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये 565 पदांवर बंपर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
म्हाडा
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 4:39 PM

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीनं होणार आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले आहेत. www.mhada.gov.in या वेबसाईटवर 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमदेवारांनी म्हाडाची अधिकृत जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या तारखा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील 565 जांगासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे. तर, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क 15 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार जमा करु शकतात. तर, ऑफलाईन लेखी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी म्हाडाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रथम जाहिरात वाचून नंतर अर्ज सादर करावेत.

ऑफलाईन लेखी परीक्षा

म्हाडाकडून विविध पदांसाठी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा होईल, अशी प्राथमिक माहिती आहे. लेखी परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि संबंधित पदाशी निगडित प्रश्न असे एकूण 200 गुणांसाठी लेखी परीक्षा होईल. पदनिहाय लेखी परीक्षेच्या काठिण्य पातळीत बदल असतील.

परीक्षा शुल्क

म्हाडाकडील विविध पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.

अर्ज कसा सादर करावा?

स्टेप 1 : प्रथम म्हाडाच्या www.mhada.gov.in वेबसाईटला भेट द्या. स्टेप2 : ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवून रजिस्ट्रेशन करा स्टेप 3 : नोंदणी केल्यानंतर लॉगीन करुन अर्जातील माहिती भरा स्टेप 4 : संपूर्ण अर्ज भरल्यानंतर शुल्क भरून अर्ज सादर करा स्टेप 5 : अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून सोबत ठेवा

इतर बातम्या:

IRCTC Recruitment 2021: आयआरसीटीसीमध्ये अप्रेंटिसची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी

Maharashtra SET 2021 Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षा

Mhada Recruitment 2021 for 565 post for apply check details here

Non Stop LIVE Update
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.