
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. महावितरण विभागात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महावितरणकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.
विद्युत वितरण कंपनी मर्यादितकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणाची नाही तर वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले उमेदवाराच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बी.एम.एस, बी.बी.ए. एमएस सीआयटी, बी.कॉम किंवा कॉम्प्युटर सायन्सची पदवी असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 32 असणे आवश्यक आहे. याच वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. वयाच्या अटीमध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ही द्यावी लागणार आहे. ही परीक्षा 150 मार्कांची असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. www.mahadiscom.in या साईटवर जा आणि या भरती प्रक्रियेसाठी थेट अर्ज करा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामता मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. 20 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेच्यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही नाही करू शकत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.