सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 80 हजारापेक्षा जास्त पगार, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू…

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती असून लगेचच अर्ज करा.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 80 हजारापेक्षा जास्त पगार, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू...
NPCIL Bharti 2025
Updated on: Nov 10, 2025 | 12:13 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विविध पदे भरली जातील. 122 पदांसाठी ही भरती सुरू असून रिक्त जागा भरल्या जातील. ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. 27 नोव्हेंबर 2025 भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असून त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. ही भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार असणार आहे. साहित्य व्यवस्थापन, उप व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक अशी विविध पदे भरती जातील.

ऑनलाईन पद्धतीने करा भरतीसाठी अर्ज 

या भरती प्रक्रियेसाठी 7 नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी, ही महत्वाची अट ठेवण्यात आली. कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. उप व्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 86,955 रूपये पगार मिळणार आहे.

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण 

कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 54,870 रुपये पगार असणार आहे. उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 असावे, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी अर्ज करण्यासाठी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारी नियमानुसार वयाच्या अटीमध्ये सवलत देण्यात आली. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड केली जाईल.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकता.न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा वेबसाईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची इतर माहिती आरामात मिळेल. मग उशीर कशाला करत आहात लगेचच या भरतीसाठी अर्ज करा.