
नवी दिल्ली : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया, सेल (Steel Authority of India, SAIL) ने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या पदांसाठी भरती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 46 पदांवर नेमणुका घेण्यात येतील. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, सेलची अधिकृत वेबसाईट sailcareers.com च्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया 1 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. ही भरती फक्त झारखंड, ओडिसा आणि मध्य प्रदेश या राज्यांत असलेल्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या विभागातील विविध खाणींमध्ये पोस्टिंगसाठी घेण्यात आली आहे. (Recruitment for Medical Officer and Medical Expert posts in Steel Authority of India)
अर्ज करण्याची तारीख : 1 एप्रिल, 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल, 2021
स्पीड पोस्ट / रजिस्टर्ड माध्यातून अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख : 7 मे, 2021
मेडिकल ऑफिसर – 26 पोस्ट
मेडिकल स्पेशालिस्ट – 20 पोस्ट
वैद्यकीय अधिकारी डेंटल पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून बीडीएस पदवी घेतली पाहिजे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संस्था यांचा एक वर्षाचा अनुभव असावा. वैद्यकीय अधिकारी ओएचएस पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस पदवी घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त वैद्यकीय तज्ज्ञ औषध पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पीजी डिग्री व डीएनबी पदवी प्राप्त केलेली असावी.
वैद्यकीय अधिकारी डेंटल, ओएचएस, जीडीएमओ या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे असेल. पात्र उमेदवारांना कोलकाता येथे लेखी परीक्षा / सीबीटीमध्ये हजर रहावे लागेल.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,600 ते 50,500 रुपये देण्यात येणार असून वैद्यकीय तज्ज्ञांच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवारांना दरमहा 32,900 ते 58,000 रुपये पगार दिला जाईल. (Recruitment for Medical Officer and Medical Expert posts in Steel Authority of India)
ग्राऊंडवर साडे 6 फुट उंचीच्या बोलरचं वादळ, 40 रनवर 8 विकेट गेल्यानं इंग्लंडच्या टीमचं सरेंडरhttps://t.co/1ngnVtf8Uo#England | #westindies | #cricket | #onthisday
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
इतर बातम्या
होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक; ममतादीदींची डरकाळी