दिल्ली विद्यापीठाचा टॉपर, गावातल्या छोट्याश्या भांडणामुळे गुन्हेगारी विश्वात शिरला, बघता बघता कुख्यात गुंड बनला

दिल्ली पोलिसांनी कुख्यात गुंड कुलदीप सिंह ऊर्फ फज्जा याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे (Story of Gangster Kuldeep Fajja was topper in Delhi University)

दिल्ली विद्यापीठाचा टॉपर, गावातल्या छोट्याश्या भांडणामुळे गुन्हेगारी विश्वात शिरला, बघता बघता कुख्यात गुंड बनला
दिल्ली विद्यापीठाचा टॉपर ते कुख्यात गुंड, एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या कुलदीप फज्जाची कहाणी
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 5:23 PM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी कुख्यात गुंड कुलदीप सिंह ऊर्फ फज्जा याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. फज्जा याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, 25 मार्चला तो पोलीस कस्टडीमधून पळून गेला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोठ्या चालाखीने त्याला शोधून कंठस्नान घातलं. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेलेला फज्जा हा एकेकाळी दिल्ली विद्यापीठाचा टॉपर होता. पण एक हुशार विद्यार्थी गुन्हेगारी विश्वात नेमका कसा पडला? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Story of Gangster Kuldeep Fajja was topper in Delhi University).

2013 मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल

कुलदीप सिंह याने दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित अशा किरोडीमल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. त्याने या कॉलेजमध्ये वनस्पती विभागात ऑनर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, 2013 साली गावात एक छोटासा वाद झाला. या वादातून त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तो या विश्वात भरडला गेला. या घटनेनंतर त्याने हातात बंदूक धरली. त्याने प्रचंड गुन्हे केले. त्याच्याविरोधात लूटमारसह अनेकांत्या हत्येचे गुन्हे आहेत.

फज्जा दिल्ली पोलिसांच्या रडारवर होता

कुलदीप सिंह हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर होता. गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलीस त्याला 25 मार्चला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात त्याच्या मेडिकल टेस्टसाठी घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालयाबाहेर फज्जाच्या सहकाऱ्यांनी गोळीबार करत त्याला पळवून नेलं. फज्जा पळाल्यामुळे दिल्ली पोलिसांची नाहक बदनामी झाली. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक त्याचा शोध घेत होतं. त्याचं कुटुंब नरेलाच्या नया बांस भागात राहतं. पोलिसांनी सगळ्या संशयित ठिकाणी त्याचा शोध घेतला.

दिल्लीच्या रोहिणी परिसरात एन्काउंटर

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतील रोहिणी परिसरात एका अपार्टमेंटमध्ये फज्जा आणि त्याच्या सहकाऱ्यांना स्पॉट केलं होतं. त्यानंतर पोलीस रात्री उशिरा त्या परिसरात दाखल झाले. पोलीस परिसरात येताच फज्जाने समोरुन गोळीबार सुरु केला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलं. या गोळीबारात काही पोलिसांच्या बुलेट प्रुफ जॅकेटला गोळी लागली होती, असंही पोलिसांनी सांगितलं (Story of Gangster Kuldeep Fajja was topper in Delhi University).

हेही वाचा : पतीकडून अनैसर्गिक सेक्स, सासऱ्याकडून बलात्कार, पीडित महिलेचे गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.