AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Of India : सरकारी नोकरी मिळवा, घरच्यांची कटकट मिटवा ! BOI कडून भरती प्रक्रिया सुरु, लवकरात लवकर अर्ज करा…

10 मे 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या बँक भरतीसाठी निवड प्रक्रिया काय असेल ? पगार किती असेल ? कोणत्या पदांवर नोकरी मिळणार ? या बद्दलची सर्व माहिती बातमीत दिलेली आहे.

Bank Of India : सरकारी नोकरी मिळवा, घरच्यांची कटकट मिटवा ! BOI कडून भरती प्रक्रिया सुरु, लवकरात लवकर अर्ज करा...
BOI कडून भरती प्रक्रिया सुरुImage Credit source: Bank Of India Official Website
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 03, 2022 | 2:29 PM
Share

सरकारी नोकरी (Government Job) शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी (Opportunity) आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. ही भरती स्केल 4 च्या अधिकाऱ्यांपर्यंत विविध पदांवर केली जाणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. 10 मे 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या बँक भरतीसाठी निवड प्रक्रिया काय असेल ? पगार किती असेल ? कोणत्या पदांवर नोकरी मिळणार ? या बद्दलची सर्व माहिती बातमीत दिलेली आहे. बीओआय रिक्रूटमेंटच्या वेबसाईटवर नोकरीची अधिसूचना bankofindia.co.in जारी करण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचं कमाल वय 38 असावं. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पगार किती असेल ?

  • ज्युनिअर मॅनेजमेंट स्केल 1 – बेसिक पे 36 हजार ते 63,840 रुपये प्रति महिना
  • मिडल मॅनेजमेंट स्केल 2 – बेसिक पे 48,170 ते 69,810 रुपये प्रति महिना
  • मिडल मॅनेजमेंट स्केल 3 – बेसिक पे 63,840 ते 78,230 रुपये प्रति महिना
  • सिनिअर मॅनेजमेंट स्केल 4 – बेसिक पे 76,010 ते 89,890

हा फक्त बेसिक पे आहे. इतर सर्व भत्त्यांसह पूर्ण पगार उपलब्ध असेल. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मिडल मॅनेजमेंट स्केल 2 या अधिकाऱ्याला दरमहा 1.75 लाख रुपये पगार मिळणार आहे. त्याचबरोबर स्केल 3 ऑफिसरला दरमहा 2.18 लाख रुपये पगार दिला जाणार आहे.

BOI शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आहे. आपण खाली दिलेल्या बँक ऑफ इंडिया जॉब नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती तपासू शकता.

BOI नोकरी : अर्ज कसा करावा

बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 26 एप्रिल 2022 पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 10 मे 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाची प्रिंट तुम्हाला 25 मे 2022 पर्यंत घेता येईल. अर्जाची करण्यासाठीची लिंक पुढे दिली आहे. एससी आणि एसटीसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. इतर सर्व वर्गांसाठी 850 रुपये आहे.

BOI अधिकारी निवड प्रक्रिया

रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, मुलाखत / गटचर्चेच्या आधारे करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

पदाचे नाव आणि उपलब्ध जागा

Total On Regular Basis  – 594

  1. Economist – 02
  2. Staistician – 02
  3. Risk Manager- 02
  4. Credit Analyst – 53
  5. Credit Officers- 484
  6. Tech Appraisal – 09
  7. IT Officer- Data Centre – 42

Total On Contract Basis – 102

  1. Manager IT – 21
  2. Senior Manager IT – 23
  3. Manager IT (Data Centre) – 6
  4. Senior Manager IT (Data Centre) – 06
  5. Senior Manager (Network Security) – 05
  6. Senior Manager (Network Routing & Switching Specialists) – 10
  7. Manager point (End Point Security) – 03
  8. Manager (Data Centre) -System Administrator Solaris/Unix – 06
  9. Manager (Data Centre) – System Administrator Windows – 03
  10. Manager (Data Centre) – Cloud Virtualisation – 03
  11. Manager(Data Centre)- Storage & Backup Technoligies – 03
  12. Manager(Data Centre)- Network Visualisation On SDN-Cisco ACI) – 04
  13. Manager(Database Expert) – 05
  14. Manager (Technology Architect) – 02
  15. Manager ( Technolgy Architect)- 02
  16. Manager (Application Architect) – 02

Application – Click Here

Job Notification – Click Here

महत्त्वाची बातमी

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप