Sarkari Naukri 2021: लोकसभा सचिवालयात विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

| Updated on: Jul 25, 2021 | 5:39 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. लोकसभा सचिवालयातील विविध पदांवरील भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Sarkari Naukri 2021: लोकसभा सचिवालयात विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
लोकसभा सचिवालयात भरती
Follow us on

Sarkari Naukri 2021 नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. लोकसभा सचिवालयातील विविध पदांवरील भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार डिजिटल हेड आणि वरिष्ठ निर्मात्यांसह बऱ्याच पदांवर भरती केली जाणार आहे. लोकसभा सचिवालयातील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लोकसभा सचिवालयाच्या अधिकृत संकेतस्थळ loksabhadocs.nic.in ला भेट देणं आवश्यक आहे.

भरतीचं नोटिफिकेशन वाचण्याचं आवाहन

लोकसभा सचिवालयातील विविध पदांवर भरतीसाठीचं नोटिफिकेशन वाचूनचं मग उमेदवारांनी अर्ज करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ नियमांनुसार केलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जात काही चूक झाल्यास ते अर्ज नाकारले जातील, असं सांगण्यात आलं आहे.

कोणत्या पदांवर भरती

लोकसभा सचिवालयाने डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर / निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स प्रोमो जीएफएक्स आर्टिस्ट, ग्राफिक्स जीएफएक्स आर्टिस्ट, ग्राफिक्स स्केच आर्टिस्ट, ग्राफिक्स पॅनेल जीएफएक्स ऑपरेटर, प्रोमो एडिटर, सिनीअर व्हिडिओ एडिटर, ज्युनिअर व्हिडिओ एडिटर यांना आमंत्रित केले आहे. संपादक, स्विचर, सिनिअर सोशल मीडिया कंटेंट रायटर, कंटेंट रायटर , सोशल मीडिया हँडल मॅनेजर आणि वेबसाइट व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता

डिजिटल हेडच्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी बीटेक किंवा एमबीए उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सिनीअर प्रोड्युसर पदासाठी उमेदवारानं पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याला दहा वर्षांचा अनुभवही असणं आवश्यक आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्याशिवाय इतर पदांच्या पात्रतेसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे.

वय

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेतील सूट आणि इतर माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन पाहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तर, निवड झालेल्या उमेदवारांना पगार शासकीय नोकरीतील नियमानुसार असेल. याशिवाय मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या अर्जाची अंतिम तारीख 28 जुलै 2021 आहे.

इतर बातम्या:

VIDEO: राज्यावरील संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण; नारायण राणेंचा घणाघाती हल्ला इतर जिल्हे

Narayan Rane Live | ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही : नारायण राणे

Sarkari Naukri 2021 in Loksabha on Senior Producer and Various Post know details