AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करण्यास 5 दिवस राहिले आहेत.  SBI Clerk Recruitment

SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस बाकी
स्टेट बँक
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 12, 2021 | 10:27 AM
Share

SBI Clerk Recruitment 2021: नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी स्टेट बँकेने 17 मे हा दिनांक निश्चित केला आहे. ( SBI Clerk Recruitment 2021 last date near to application for five thousand vacancies junior associates know details here)

अर्ज कुठे करायचा?

स्टेट बँकेच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी उमेदवार 17 मेपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in, bank.sbi/careers या वेबसाईटला भेट द्यावी.

पात्रता:

ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 20 वर्ष ते 28 वर्षांदरम्यान असणं गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया:

ज्युनिअर असोसिएटस पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करताना उमेदवार जी प्रादेशिक भाषा निवडतील त्या भाषेमध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल. पूर्व परीक्षा 1 तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 100 प्रश्न असतील. ही परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि 0.25 गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.

परीक्षा फी

ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

पगार

स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएटस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजार 900 ते 47 हजार 920 पगार मिळेल.

अर्ज कुठे करणार ?

उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा. जे अर्ज करणार आहेत ते sbi.co.in/careers वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

संबंधित बातम्या:

Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार

SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

( SBI Clerk Recruitment 2021 last date near to application for five thousand vacancies junior associates know details here)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?