SBI Recruitment 2026: स्टेट बँकेत नोकरीची संधी! 1538 हुन अधिक जागा; जाणून घ्या इतर डिटेल्स

SBI Clerk Recruitment 2026: तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. या बँकेत 1538 हुन अधिक जागांसाठी भरती होणार आहे. अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून सर्व डिटेल्स जाणून घ्या.

SBI Recruitment 2026: स्टेट बँकेत नोकरीची संधी! 1538 हुन अधिक जागा; जाणून घ्या इतर डिटेल्स
SBI Clerk Recruitment 2026
| Updated on: Nov 20, 2026 | 12:43 PM

तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर आम्ही महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली. या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण १,५३८ बॅकलॉग रिक्त जागा राखीव आहेत. पात्र उमेदवार ७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपले अर्ज सादर करू शकतात. निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा असणार आहे. दोन्ही परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या शाखांमध्ये लिपिक (क्लर्क) म्हणून नियुक्ती केली जाईल. ही भरती बँकिंग क्षेत्रात एक चांगले करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, उत्तम लाभ आणि बँकिंग क्षेत्रात एक प्रतिष्ठित करिअर घडवण्याची संधी मिळते. बँकिंग उद्योगात नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीने ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

भरतीची अधिसूचना जारी!

स्टेट बँक ऑफ इंडियाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी एसबीआय क्लर्क भरती २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना केवळ बॅकलॉग रिक्त जागांसाठी असून, नियमित रिक्त जागांसाठीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

Loading...

भरतीसाठी वयोमर्यदा किती?

या भरतीसाठी वयोमर्यादा २० ते २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करू शकतात.

महत्तवाचे तपशील जाणून घ्या

परीक्षा आयोजित करणारी संस्था- स्टेट बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव- क्लर्क / ज्युनियर असोसिएट

एकूण रिक्त जागा – १५३८ (बॅकलॉग रिक्त जागा)

भरतीचा प्रकार – बँक नोकरी

अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन

वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

निवड प्रक्रिया – प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाइन

वेतन दरमहा अंदाजे – ४६,००० रुपये

अधिकृत वेबसाइट- स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट

ऑनलाईन करा आवेदन

स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘एसबीआय क्लर्क’ भरती २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता व संपर्क माहितीसह आवश्यक ती सर्व माहिती द्यावी लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us