SRPF Bharti 2022: इच्छुक उमेदवार अलर्ट ! ‘ही’ भरती निघालीये…पात्र आहात का बघा, असाल तर अर्ज करा

र्ज ऑफलाइन पद्धतीनं पुढील पत्त्यावर पाठवावेत 1) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली 2) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल) गट क्र 4 हिंगणा रोड नागपूर 3) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

SRPF Bharti 2022: इच्छुक उमेदवार अलर्ट ! 'ही' भरती निघालीये...पात्र आहात का बघा, असाल तर अर्ज करा
राज्य राखीव पोलिस बल
Image Credit source: Official Website
रचना भोंडवे

|

May 21, 2022 | 1:47 PM

राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मध्ये 105 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज (Application) करायची पद्धत ऑफलाइन असून अर्ज करायची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. या भरतीचा प्रकार सरकारी आहे. सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी पात्र असणारे इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 12वी उत्तीर्ण (12th Pass) असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी परीक्षा घेऊन निवड केली जाणार आहे. कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांनाच ही संधी उपलब्ध आहे. अर्ज शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 450 तर SC/ ST/ OBC/ EWS कॅटेगरीसाठी 350 रुपये आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीनं पुढील पत्त्यावर पाठवावेत 1) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली 2) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल) गट क्र 4 हिंगणा रोड नागपूर 3) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी इच्छुक उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे

हे सुद्धा वाचा

वय मर्यादा

 • कमीत कमी – 18 वर्षे
 • जास्तीत जास्त – 25 वर्षे

अर्ज पाठवायचा पत्ता

 1. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली
 2. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल) गट क्र 4 हिंगणा रोड नागपूर
 3. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय

महत्त्वाचे

 • अधिकृत वेबसाईट – Click Here
 • जाहिरात – Click Here
 • अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022
 • भरती प्रकार – सरकारी

इतर माहिती

 • एकूण पदसंख्या – 105 पदे
 • संस्था – राज्य राखीव पोलिस बल (SRPF)
 • नोकरीचं ठिकाण – गडचिरोली
 • अर्ज करायची पद्धत – ऑफलाइन
 • निवड करायची पद्धत – परीक्षा
 • विभागाचं नाव – सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

अर्ज फी

 • Open – 450/- रुपये
 • SC/ ST/ OBC/ EWS – 350/- रुपये

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें