शिक्षण मंत्रालयात काम करण्याची मोठी संधी, थेट 1.15 कोटी पगार, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे. विशेष म्हणजे नुकताच भरती प्रक्रिया सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आलीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावा.

शिक्षण मंत्रालयात काम करण्याची मोठी संधी, थेट 1.15 कोटी पगार, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 25, 2023 | 12:37 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. फक्त हेच नाही तर थेट शिक्षण मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही काढण्यात आलीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. विशेष म्हणजे कोटींच्या घरात पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. तसेच वयोमर्यादाची देखील अट ठेवण्यात आलीये.

नॅचरल सायन्स सेक्टरच्या सायन्स वर्ल्ड अॅकॅडमी (TWAS) मध्ये कार्यकारी संचालक पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीये. यूनेस्कोद्वारे या पदासाठी भरती इटलीच्या ट्रायस्टे शहरात केली जाणार आहे. विशेष म्हणजे 138,996 अमेरिकी डॉलरप्रमाणे उमेदवाराला पगार हा दिला जाणार आहे.

म्हणजे उमेदवाराला 1.15 कोटी पगार हा मिळणार आहे. तसेच 30 दिवस वर्षाला सुट्टी देखील मिळणार आहे. इच्छुकांना यूनेस्को करियर पोर्टलच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

3 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. TWAS मध्ये कार्यकारी संचालकासाठी उमेदवाराचे नॅचरल सायन्समध्ये पीएचडी असणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक संशोधन आणि प्रशासनात किमान 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. फक्त सरकारीच नाही तर खाजगीमध्ये तरी उमेदवाराला कामाचा अनुभव असावा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाऊ शकते. मुळात म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला संपर्क केला जाईल. त्यानंतर या भरती प्रक्रियेबद्दलची प्रक्रिया केली जाईल. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे करावे लागणार आहेत.

Follow Us