थेट ‘या’ बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करू शकता. मोठी बंपर भरती बँकेमध्ये सुरू आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक सविस्तर माहिती.

थेट 'या' बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 7:20 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी बातमी आहे. इतकेच नाही तर थेट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. होय तुम्ही खरे ऐकले आहे, थेट बँकेमध्ये तुम्ही नोकरी ही करू शकता. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालीये. इच्छुकांनी आता अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज करावा. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी हे अर्ज बँकेकडून मागवण्यात आलेत.

ही भरती प्रक्रिया आयडीबीआय बँकेकडून सुरू आहे. थेट आयडीबीआय बँकेमध्ये नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते. idbibank.in या अधिकृत साइटला जा. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती ही मिळेल. तिथे जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेचा अर्ज भरावा लागणार आहे. ही खूप मोठी संधीच तुमच्याकडे असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत. ही भरती प्रक्रिया 86 रिक्त जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून महाव्यवस्थापक, असिस्टंट जनरल मॅनेजर, व्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज दाखल करू शकता. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 25 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1000 हजार रूपये हे भरावे लागणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराने सर्वात अगोदर idbibank.in या साईटला भेट द्यावी. तिथे तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही बघायला मिळेल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.