AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे भारतातली सगळ्या श्रीमंत सेल्फ-मेड वूमन अंडर 40? नाव वाचून आश्चर्य वाटेल

स्वयंनिर्मित श्रीमंतांच्या यादीत एकूण 16 नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये 39 वर्षीय देवीता सराफच्या नावाचाही समावेश आहे.

कोण आहे भारतातली सगळ्या श्रीमंत सेल्फ-मेड वूमन अंडर 40? नाव वाचून आश्चर्य वाटेल
| Edited By: | Updated on: Jan 10, 2021 | 7:18 PM
Share

मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या हुई हुरून इंडिया 2020 सेल्फ-मेड रिच या खास स्पर्धेच्या लिस्टमध्ये (IIFL Wealth Hurun India 40 & Under Self-Made Rich List), देवीता सराफचंही नाव आलं आहे. स्वयंनिर्मित श्रीमंतांच्या यादीत एकूण 16 नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये 39 वर्षीय देवीता सराफच्या नावाचाही समावेश आहे. देवीता सराफ या व्हीयू ग्रुपच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत. (Who is the richest self made woman under 40 in India Devita saraf)

देवीता सर्राफचं नाव या यादीत सर्वात खाली असलं तरी 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या यादीत ती एकमेव महिला आहे. देवीता सराफची एकूण संपत्ती सुमारे 1200 कोटींची आहे. तिने हार्वर्डमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यात खूप प्रगती केली आहे. या यादीमध्ये स्वत:चं नाव पाहून खूप आनंद झाल्याचंही देवीताने म्हटलं आहे. सध्या सर्वच स्तरातून तिच्या यशाचं कौतूक केलं जात आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुरुन इंडियाच्या यादीमध्ये नाव येण्यााधी तिचं नाव फॉच्र्युन इंडियाच्या (2019) भारतातील सर्वाधिक पॉवरफुल वुमनमध्येही आलं होतं. इतकंच नाही तर 2018 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये भारतातून देवीता सराफचाही क्रमांक लागला आहे. तिचं हे यश आताच्या पिढीसाठी खरंच कौतूक करण्यासारखं आहे.

एका मुलाखतीमध्ये देवीता म्हणाली की, मी तरुणांचं प्रतिनिधित्वसुद्धा करत आहे. देशातील सर्व युवतींना प्रोत्साहन देण्याचं मी करत आहे. तर या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव जीरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत (40) आणि निखिल कामत ( 34) यांची नावं आहेत. ज्यांची एकूण संपत्ती 24 हजार कोटी आहे. (Who is the richest self made woman under 40 in India Devita saraf)

संबंधित बातम्या – 

Air India Recruitment 2021: परीक्षा न देता मिळवा एअर इंडियामध्ये नोकरी, असं करा अप्लाय

Special report | माझगाव डॉकमध्ये 410 पदांवर निघाली भरती; 8 वी पासना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

(Who is the richest self made woman under 40 in India Devita saraf)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.