Bhiwandi Girl Death : झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; भिवंडीतील धक्कादायक घटना

| Updated on: Jul 25, 2022 | 8:36 PM

त्या घटनेने भिवंडी परिसरात (Bhiwandi Crime) सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही खेळ बाळगताना केलेला हलगर्जीपणा किती घातक ठरू शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं आहे. 

Bhiwandi Girl Death : झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; भिवंडीतील धक्कादायक घटना
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
Follow us on

भिवंडी : आपल्याकडे अनेक पारंपारिक खेळ खेळले जातात. त्यातलाच एक खेळ म्हणजे आपण झाडाला किंवा उंच छताला दोरे बांधून झोका (Swing) खेळला जातो. या झोक्याची लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये तर प्रचंड क्रेझ आहे. मात्र हा झोका खेळण्यास कधीकधी किती महागात पडतं, हे दाखवणारी एक घटना भिवंडीत घडली (Bhiwandi Girl Death) आहे. झोका खेळणं या तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. कारण या झोक्याच्या खेळात अकरा वर्षीय चिमुकलीने दुर्दैवाने आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या घटनेने भिवंडी परिसरात (Bhiwandi Crime) सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही खेळ बाळगताना केलेला हलगर्जीपणा किती घातक ठरू शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.

नेमका प्रकार काय घडला?

भिवंडीतली ही अकरा वर्षीय चिमूरडी झोका खेळायला गेली. मात्र त्यावेळी तुझ्या झोका खेळण्याकडे  घरातल्या कणा मोठ्याचं लक्ष नव्हतं. ती एकटी झोका खेळत होती आणि झोका खेळत असताना अपघाताने झोक्याच्या साडी मध्ये तिचं डोकं अडकून गळ्याला फास लागला आणि हेच भोवलं. ही घटना भिवंडीतल्या भादवड पुंडलिक नगर मधील आहे. त्यामुळे या परिसरावर सध्या शोककळा पसरली आहे.

आई-वडिल मजूरीसाठी गेल्यावर घडली घटना

या मुलीचे आई-वडील दोघेही मजुरीचे काम करतात. त्यामुळे सहाजिकच मुलांकडून वेळ देणे जमत नाही. त्या दिवशी ते आपल्या मुलीला खेळायला सोडून मजुरीसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच त्यांच्या पाठीमागे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीने आपल्या मैत्रिणींसोबत झोका खेळण्यासाठी दरवाज्यात साडी बांधूनच झोका तयार केला होता. मात्र डोक्याला पिळ देत बसलेल्या फासातून ती मुलगी वाचू शकली नाही, तो एवढा आवळत गेला की या मुलीचा श्वास थांबला आणि शेवटी खुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतलेली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केलेली आहे.