AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने थेट मानले पाकिस्तानचे आभार, मोठी खळबळ, भारतासाठी अत्यंत…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. मात्र, यादरम्यान पाकिस्तान आणि अमेरिकेत जवळीकता वाढल्याचे चित्र आहे. त्यामध्येच अमेरिकेने पाकिस्तानबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे.

अमेरिकेने थेट मानले पाकिस्तानचे आभार, मोठी खळबळ, भारतासाठी अत्यंत...
US and Pakistan
| Updated on: Dec 20, 2025 | 9:36 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लावला. शिवाय भारताबद्दल धक्कादायक विधाने अमेरिकेतून केली जात आहेत. यादरम्यान अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारली आहेत. हेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेची वाढती जवळीकता भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नाही. उलट अमेरिकेच्या मागून भारतात येत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काही महत्वपूर्ण करार भारतासोबत केले. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये थेट भारतीय बाजारपेठेत प्रवेश हवा आहे. मात्र, त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. यादरम्यानच पाकिस्तानचे आभार मानताना अमेरिका दिसली आहे.

थेट अमेरिकेने पाकिस्तानचे आभार मानल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी शुक्रवारी दुजोरा दिला की, गाझामधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलात सैन्य पाठवण्याची ऑफर पाकिस्तानने दिली आहे. ही ऑफर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी शांतता प्रस्तावात देण्यात आली होती. ज्याचा उद्धेश फक्त हे युद्ध थांबवणे आणि शांतता आहे.

रुबिओ म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या प्रस्तावाबद्दल विचार करत आहोत आणि त्यांचे आभारी आहोत की, त्यांनी हा प्रस्ताव मांडला. मला वाटते की, त्यांच्याकडून पक्का शब्द घेण्यापूर्वी आपण त्यांना आणखी काही प्रश्नांची उत्तरे घेतली पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाच्या अमेरिका फेऱ्या वाढल्या आहेत. काहीही करून त्यांना अमेरिकेच्या जवळ राहायचे आहे.

त्यामध्येच त्यांनी मोठा प्रस्ताव अमेरिका दिला असून अमेरिकेने त्यानंतर त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिका आणि पाकिस्तानची वाढती जवळीकता नक्कीच भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पुतिन हे दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट बघायला मिळाला. यासोबतच पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताच्या दाैऱ्यावर आले होते. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली होती.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!