MBBS विद्यार्थीनीच्या हत्येचा धक्कादायक खुलासा, अनेक तास गप्पा केल्यानंतर केली हत्या

२९ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. परंतु ती परतलीच नाही. तिचा शोध न लागल्याने बोईसर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रा दाखल केली. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता

MBBS विद्यार्थीनीच्या हत्येचा धक्कादायक खुलासा, अनेक तास गप्पा केल्यानंतर केली हत्या
एका सेल्फीने उलगडले हत्येचे रहस्य
Image Credit source: social media
| Updated on: Jan 20, 2023 | 2:30 PM

मुंबई : मुंबईतील पालघर (mumbai)येथील राहणारी सदिच्छा साने हिचा हत्येचा खुलासा झाला आहे. सुमारे १४ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सदिच्छाची हत्या जीवरक्षक मिथू सिंग याने केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सदिच्छा जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात (MBBS student)शिकत होती. नोव्हेंबर २०२१ पासून ती बेपत्ता होती.

२९ नोव्हेंबर २०२१ रोजी सदिच्छा परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. परंतु ती परतलीच नाही. तिचा शोध न लागल्याने बोईसर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रा दाखल केली. तिच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. तिच्या शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.५८ वाजता सदिच्छा विरार स्थानकातून लोकल ट्रेनमध्ये चढली होती. ती आधी अंधेरीला उतरली आणि तिथून दुसरी लोकल पकडून वांद्रे येथे गेली. वांद्रे बँडस्टँडला जाण्यासाठी तिने ऑटो पकडली.
तिच्या मोबाईलच्या लोकेशनवरून ती दुपारपर्यंत त्याच परिसरात फिरत होती.

आरोपीला अटक :

सदिच्छा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी मिठू सिंग याला पोलिसांनी अटक केली. त्याने मुंबईच्या चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. सदिच्छा सानेची हत्या करून तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचे सांगितले.या कबुलीनंतर त्याने ही हत्या का केली आणि हत्येपूर्वी विद्यार्थ्यासोबत काही गैरकृत्य होते का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

काय सांगितले आरोपीने :

आरोपी मिठू सिंगने पोलिसांना सांगितले की, त्या दिवशी त्याची ड्युटी वांद्रे बॅंडस्टँडवर होती. सदिच्छा एकटी होती. ती समुद्राकडे जात होती. त्यामुळे ती आत्महत्या करेल असा मला वाटले. मी तिच्या मागे गेलो आणि तिला पकडले. तिने आपण आत्महत्या करून मरणार नसल्याचे सांगितले. यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले. रात्री १२ ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ते बँडस्टँडमधील खडकावर बसून होते. त्याठिकाणी काही सेल्फी घेतल्यानंतर तो तेथून निघून गेला.