हायस्कूलमध्ये दिलेल्या डाळ-भातातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु

| Updated on: Jan 27, 2023 | 5:22 PM

मळमळ, उलटे आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हायस्कूलमध्ये दिलेल्या डाळ-भातातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु
सांगलीत 32 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर येथील वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारमधून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरु आहेत.

सर्व बाधित मुलं इयत्त पाचवी आणि सातव्या इयत्तेतील आहेत. शालेय पोषण आहारामधून शाळेला जो डाळ भात दिला जातो, त्यामधून विषबाधा झाली.

विद्यार्थ्यांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

मळमळ, उलटे आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मात्र त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताचं शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.

चंद्रपूरमध्येही जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा

गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. यावेळी स्थानिक इको पार्कमध्ये भोजन शिजविण्यात आले होते. याच भोजनात चिकन शिजवून विद्यार्थ्यांना सर्व्ह करण्यात आले.

याच चिकनमधून एकूण 52 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यापैकी 12 विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.