Pune Crime : आई-वडिल बाहेर गेले होते, माथेफिरु तरुणाने बंगल्यासह कार पेटवली !

सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: |

Updated on: Jan 27, 2023 | 3:47 PM

पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई-वडील वाजेवाडीमध्ये गेले होते. यावेळी प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लावली.

Pune Crime : आई-वडिल बाहेर गेले होते, माथेफिरु तरुणाने बंगल्यासह कार पेटवली !
तरुणाने स्वतःच्या बंगल्यासह कार जाळली
Image Credit source: TV9

शिरूर /पुणे : आई-वडिल घरी नसताना एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या बंगल्यासह कार पेटवल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे घडली आहे. ऐन यात्रेच्या दिवशी कार आणि बंगला पेटवून देत तरुण गावामध्ये तमाशा पाहण्यासाठी गेला. प्रज्योत कांतीलाल तांबे असे या युवकाचे नाव आहे. घटनेची मिळताच शिक्रापूर पोलीस आणि नागरिकांनी तातडीने आग विझवली. त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

आई-वडिल बाहेर गेले होते

पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे या युवकाचे आई-वडील वाजेवाडीमध्ये गेले होते. यावेळी प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली कार पेटवून देत बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लावली.

घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, हवालदार भरत कोळी, उद्धव भालेराव, वाजेवाडीच्या पोलीस पाटील सोनाली वाजे, कचरूनाना वाजे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

आगीत कार आणि बंगल्याचे मोठे नुकसान

कारचे चारही टायर तसेच सिलेंडरने स्फोट घेतला. यावेळी शेजारील पाण्याची मोटार चालू करुन आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही वस्तू जळून खाक झाल्या.

पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले

दरम्यान जाळपोळ करणारा प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर आणि पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांनी तेथे जात प्रज्योत याला ताब्यात घेतले. याबाबत कांतीलाल बाळासाहेब तांबे यांनी फिर्याद दिली.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI