रुद्र बी टू वाघाची शिकार! आता आणखी 4 आरोपींना बेड्या, का करण्यात आली वाघाची हत्या?

अनिल आक्रे

अनिल आक्रे | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Jan 30, 2022 | 8:27 PM

Rudra B2 Tiger : रुबाबदार, देखण्या पाच ते सात वर्ष वयाचा रूद्र बी-टू वाघाच्या शिकारीनंतर वन्यजीव प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केला होता.

रुद्र बी टू वाघाची शिकार! आता आणखी 4 आरोपींना बेड्या, का करण्यात आली वाघाची हत्या?
भंडाऱ्यात वाघाची शिकार करणारे अखेर गजाआड

भंडारा : भंडारा वाघ शिकारप्रकरणी (Tiger Hunting) आता धडक कारवाई करत आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत भंडाऱ्यातील वाघाच्या शिकारप्रकरणी एकूण पाच जणांना अटक (5 Accused arrested) करण्यात आली आहे. भंडारा वन परीक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पलाडी गावाजवळ शेताच्या बाजूला नाल्यालगत वाघाचा मृतदेह आढलून आला होता. 28 जानेवारीला नर वाघ रूद्र बी-टू (Rudra B-2 Tiger) मृतावस्थेत मिळताच वनविभागात एकच खळबळ उडाली होती. यानंतर या शिकारप्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान अधिकाऱ्यांसमोर होतं. यानंतर वनाधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबविली होती. अखेर या वाघाच्या शिकारप्रकरणी अवघ्या चोवीत तासात मजुरीचे काम करणाऱ्या दिलीप नारायण नारनवरे याला अटक करण्यात आली होती. 55 वर्षांच्या दिलीप नारनवरे याला चांदोरीमध्ये राहणाऱ्याला विद्युत तारांच्या साहित्यासह अटक करण्यात आली होती. तर अन्य आरोपी फरार होते. अखेर आता सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samiksha Chawre (@sam13.03)

अखेर छडा लागला!

रुबाबदार, देखण्या पाच ते सात वर्ष वयाचा रूद्र बी-टू वाघाच्या शिकारीनंतर वन्यजीव प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केला होता. दरम्यान या शिकारीबाबत माहिती देण्याऱ्याला वनविभागामार्फत 25 हजाराचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. तसंच सर्व आरोपीना शोधण्यासाचं मोठं आव्हानदेखील समोर होतं. यामुळे भंडारा वनविभाग चांगलाच अडचणीत सापडला होता. एकीकडे भंडारा उपवनसंरक्षकांची सेवानिवृत्ती असताना उघडकीस आलेल्या घटनांमुळे त्यांच्यावर सुद्धा मानसिक दबाब होता.

परंतु वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेने घटनेची पूर्णतः उकल झाली असून आरोपींना 24 तासात अटक करण्यात वनविभागाला यश आलं आहे. वनविभागाने वाघाच्या मृत्यू प्रकरणात सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये आरोपी राजू नारायण नारनवरे (50), सुभाष झिटू चाचेरे(70) रा. चांदोरी, चैतराम गोदरू चाचेरे (36) रा. चांदोरी व विलास कुसन कागदे (50) रा. चांदोरी यांना अटक करण्यात आली. त्यामुळे वाघाच्या शिकार प्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आली आहे. भंडाऱ्याचे उप वनसंरक्षक एस. बी.भलावी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या :

Gondia Tiger | गोंदियात आढळला वाघाचा मृतदेह; नख आणि दात गायब, ही शिकार तर नाही ना?

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

तब्बल 80 वाघ-बिबट्यांची शिकार, प्राण्यांच्या जीवावर कोण उठलंय?, RTI मध्ये धक्कादायक माहिती


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI