जालनाः जाफराबादेत 9 चोरट्यांचा धुमाकूळ, घरात घुसून मुली व महिलांना मारहाण, दीड लाखांचे दागिने व मुद्देमाल पळवला

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोरांचा पाठलाग केला. एका ठिकाणी चोरांची धरपकडही झाली. मात्र चोरांची संख्या पोलिसांपेक्षा अधिक असल्याने त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. हे चोरटे दुचाकीने फरार झाले.

जालनाः जाफराबादेत 9 चोरट्यांचा धुमाकूळ, घरात घुसून मुली व महिलांना मारहाण, दीड लाखांचे दागिने व मुद्देमाल पळवला
जाफराबाद येथे एकाच घरावर 9 चोरट्यांनी हल्ला करत धुमाकूळ घातला
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 5:51 PM

औरंगाबादः जालन्यातील जाफराबादेत (Jafrabad Jalna) मंगळवारी पहाटे आदर्शनगरात चोरट्यांनी एका घरात घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जाफराबाद शहरातील या घटनेत चोरट्यांनी दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याच घराच्या परिसरातील इतर ठिकाणाहूनही काही मुद्देमाल पळवला आहे. पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

दहा मिनिटांच्या थरारात कुटुंब हादरले

जाफराबाद शहरातील आदर्श नगरात डॉ. हनुमय्या मार्ता यांचे कुटुंब राहते. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी घराचे फाटक उघडून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी दोन मुली आणि एका महिलेला मारहाण केली. हे दरोडेखोर हिंदी आणि मराठी भाषेत संवाद साधत होते. त्यांच्याकडे टॉमी, गज, रॉड यासारखी घातक अवजारे होती. आरडाओरड केली तर जिवे मारू, अशी धमकी या चोरट्यांनी घरच्यांना दिली होती. दहा मिनिटांच्या थरारात कुटुंब घाबरून गेले. तर त्यांची २५ वर्षांची व्यकंट रमना ही मुलगी चोरांनी केलेल्या मारहाणीत जालना येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच डॉ. मार्ता यांच्या गुडघ्याला रॉडचा मार लागला आहे.

पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिस निरीक्षक पी. व्ही. मदन यांनी कॉन्स्टेबल अनंता डोईफोडे एस. एस. डोईफोडे पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चोरांचा पाठलाग केला. तेव्हा चिखली रोडवरील कुंभारी फाट्यावरील जंजाळवाडी जवळ चोर पोलिसांची धरपकड झाली. मात्र चोरांची संख्या पोलिसांपेक्षा अधिक असल्याने त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. हे चोरटे दुचाकीने फरार झाले.

इतर बातम्या-

औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली

इतिहास काढला तर लक्षात येईल ‘हमाम मे सब नंगे’, जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला