AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीने पाहिला आईचा अश्लील व्हिडीओ! वडिलांना सांगितल्यानंतर… मग दृश्यम पाहूनच बायकोने…

हरियाणातील गुरुग्राम येथे गारमेंट एक्सपोर्ट कंपनीचे कंत्राटदार विक्रम यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या करण्यापूर्वी अनेक वेळा क्राइम पेट्रोल आणि दृश्यम चित्रपट पाहिला होता. या दोन्हीमधून त्यांनी खून केल्यावर काय करायचे याची माहिती मिळवली. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

मुलीने पाहिला आईचा अश्लील व्हिडीओ! वडिलांना सांगितल्यानंतर... मग दृश्यम पाहूनच बायकोने...
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 05, 2025 | 1:12 PM
Share

दिवसेंदिवस देशातील क्राईमच्या घटना वाढत चालल्या आहेत. कोणी होणाऱ्या जावयासोबतच पळून गेले आहे तर कोणी प्रियकरासाठी पतीचा खून केला आहे. दरम्यान, हरियाणातील गुरुग्राममधून अशीच एक बातमी समोर आली आहे. या घटनेने सर्वांना मोठा धक्काच बसला आहे. येथे शेजारी राहणाऱ्या एका मित्रानेच आपल्या जिवलग मित्राचा शत्रू बनून खून केला आहे. कारण? कारण आहे एक स्त्री. होय, स्त्रीच्या प्रकरणामुळे. अवैध संबंधांमुळे मित्राने आपल्याच मित्राला मृत्यूच्या दारात ठकलले आहे. एवढेच नाही, हत्या करण्याची कल्पना क्राइम पेट्रोल आणि दृश्यम चित्रपटातून मिळाली. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे…

हरियाणातील गुरुग्राम येथे गारमेंट एक्सपोर्ट कंपनीचे कंत्राटदार विक्रम यांची हत्या झाली. या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा मित्रच निघाला. पण हत्या केवळ मित्राने एकट्याने केली नाही, तर विक्रमची पत्नी सोनीने मिळून केली. अपहरणापासून ते हत्या आणि मृतदेह दफन करण्यापर्यंत ती तिचा प्रियकर रविंद्रच्या संपर्कात होती.

वाचा: अख्खं गाव ढसाढसा रडत होतं, पण तो मित्राच्या अंत्ययात्रेत DJ लावून मनसोक्त नाचत होता… चिठ्ठीत नेमकं काय होतं?

नेमकं काय घडलं?

विक्रम मूळचा बिहारमधील नवादा जिल्ह्याचा रहिवासी होता. तो आपली पत्नी सोनी देवी आणि दोन मुलांसह गुरुग्राममधील डूंडाहेड़ा गावात भाड्याच्या घरात राहत होता. आपल्याच कंपनीत तो कंत्राटी काम करत होता. 26 जुलै 2025 रोजी सकाळी तो ड्यूटीवर गेला, पण त्यानंतर तो कधीच घरी परतला नाही. त्याचा भाचा राकेश काळजीत पडला. त्याने कंपनीत फोन केला तेव्हा कळले की विक्रम सकाळी 9 वाजता तिथून निघाला होता.

तीन दिवस उलटले, पण विक्रमचा काही पत्ता लागला नाही. सोनीने 28 जुलैला उद्योग विहार पोलीस ठाण्यात गायब झाल्याची तक्रार नोंदवली. पण कुटुंबीयांना सोनीच्या वागण्यावर संशय येऊ लागला. कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली तेव्हा तिने तिचा शेजारी आणि विक्रमचा मित्र रविंद्रवर हत्येचा संशय व्यक्त केला. तिने हेही सांगितले की रविंद्रने तिच्यावर जबरदस्ती केली होती आणि तिचा व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केले होते.

मित्र आणि पत्नीने रचली हत्येची साजिश

पोलिसांनी तात्काळ रविंद्रला ताब्यात घेतले. कठोर चौकशीत रविंद्रने सांगितले की तो भाड्याच्या गाड्या बुक करणारे काम करत होता आणि त्याचे सोनीशी अवैध संबंध होते. पण हे नाते सर्वांसमोर येईल याची भीती त्यांना सतावू लागली होती. खरेतर, विक्रमच्या मुलीने रविंद्रच्या फोनमध्ये तिच्या आईचे काही अश्लील व्हिडीओ पाहिले होते. तिने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली होती. यामुळे सोनी आणि रविंद्र घाबरले की आता त्यांचे रहस्य उघड होईल. समाजात बदनामी होईल आणि त्यांचे घर मोडेल. म्हणून दोघांनी मिळून विक्रमला मार्गातून हटवण्याचा कट रचला.

दृश्यम चित्रपट पाहून पतीची हत्या

प्लानमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून दोघांनी बॉलिवूड चित्रपट दृश्यम आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग वारंवार पाहिले. त्यांना प्रत्येक ती चूक टाळायची होती, ज्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय येईल. 26 जुलैला रविंद्रने आपल्या तीन मित्र मनीष, फरियाद आणि आणखी एका व्यक्तीसह मिळून विक्रमचे अपहरण केले. चौघांनी मिळून त्याचा गळा दोरीने आवळला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह गुरुग्राममधील मोहम्मदपुर गावात एविल सोसाइटीजवळ एका खड्ड्यात दफन केला. हा खड्डा रविंद्रचा चुलत भाऊ संतरपालने आधीच खणला होता.

चुलत भावाने खणली कबर

संतरपाल गाय-म्हशींचा व्यवसाय करत होता. त्याने रविंद्रला दत्तक घेतले होते. रविंद्रने त्याला संपूर्ण कट सांगितली आणि खड्डा खणण्यासाठी तयार केले. हत्येनंतर रविंद्र आणि त्याचे साथीदार मृतदेह घेऊन संतरपालकडे पोहोचले. त्यांनी तो खड्ड्यात दफन केला. या दरम्यान सोनी सतत रविंद्रच्या संपर्कात होती. ती फोनवर प्रत्येक पावलाची माहिती घेत होती.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट