पत्नी रागाने माहेरी गेली, खूप समजूत काढूनही परत यायला तयार नव्हती; पत्नीच्या विरहात पतीने उचलले ‘हे’ पाऊल

पत्नीच्या विरहात साहबदीनने विषारी कीटनाशक प्राशन केले. यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पत्नी रागाने माहेरी गेली, खूप समजूत काढूनही परत यायला तयार नव्हती; पत्नीच्या विरहात पतीने उचलले हे पाऊल
फोनला उत्तर देत नव्हती म्हणून प्रेयसीवर अत्याचार
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 03, 2023 | 3:49 PM

अयोध्या : नाराज होऊन माहेरी गेलेली पत्नी घरी परत येण्यात तयार नव्हती. तसेच पतीसोबत बोलण्यासही तयार नसल्याने नैराश्येतून पतीने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील अयोध्येत उघडकीस आली आहे. साहबदीन असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. विषारी औषध प्राशन केल्यानंतर साहबदीनला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली.

काही दिवसापूर्वी माहेरी निघून गेली होती पत्नी

अयोध्येतील रामपूर भगन परिसरात साहबदीन आपल्या पत्नीसह राहत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा पूजेदरम्यान नाराज झाल्याने साहबदीनची पत्नी माहेरी निघून गेली होती.

पत्नीला मनवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र ती तयार नव्हती

पत्नीला मनवण्यासाठी साहबदीन अनेक वेळा सासरवाडीला गेला. त्याने पत्नीला समजावून घरी परत आणण्याचे खूप प्रयत्न केले. माहेरी गेल्यापासून पत्नी त्याच्याशी फोनवरही बोलत नव्हती. साहबदीन पत्नीला पैसेही पाठवायचा.

पत्नी घरी येण्यास तयार नसल्याने नैराश्येत होता

नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी साहबदीनने सासूच्या फोनवर कॉल केला होता. मात्र ती फोनवर बोलली नाही. काही केल्या पत्नी घरी येण्यास तयार नव्हती. यामुळे साहबदीन नैराश्येत होता.

पत्नीच्या विरहात पतीने विषारी औषध प्राशन केले

पत्नीच्या विरहात साहबदीनने विषारी कीटनाशक प्राशन केले. यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोतवाली नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.