
पती आणि पत्नी नात्यांत सवत माझी लाडकी झाल्याने गावातील लोकांसमोर तमाशा इज्जतीचा तमाशा झाल्याचा एक प्रकार घडला आहे. पती, पत्नी आणि वोह..अशा ट्रँगल असणाऱ्या काहीशा वातावरणात हा हायव्होटेज ड्रामा झाला आहे. एका गावातील एक इसम प्रेयसीच्या संगे पसार होण्याच्या तयारीत होता. परंतू त्याच्या या कृत्याची खबर त्याच्या अर्धांगिनीला अखेर लागलीच.. मग काय तमाशा घडणार आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाचीही गरज नाही…
उत्तराखंडातील उधम सिंह नगरात हा मजेशीर प्रकार घडला आहे. येथे एक प्रोढ इसम त्याच्या प्रेयसी संगे धूम ठोकण्याच्या अगदी तयारीत होता. दोघेही उडन छू होणारच होते. याची कुणकुण त्याच्या बायकोला कशीतरी लागलीच. पतीने आवराआवरी सुरु केली होती. बॅगांची भराभरी चालली होती. बायको सीआयडीप्रमाणे नवऱ्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होती.
उत्तराखंडच्या रोडवे बसने हा नवरोबा पळण्याच्या बेतात होता. बायको आणि त्याचा मुलगा पाठी पाठी गुपचूप चालत त्याच्या प्रेयसीची वाट पाहत लपून तयारीतच होते. नवऱ्याच्या मनात आनंदाने उकळ्या फुटत होत्या. अखेर त्याची प्रेयसी आली दोघांनी सुटकेच्या निश्वास टाकला. तेवढ्यात मागून त्याच्या डोक्यात बायकोची चप्पल पडली. मग काय बायकोने जमदग्नीचा अवतारातच धारण केला आणि नवरोबाची चपलेने चांगलीच धुलाई केली.
येथे पाहा व्हिडीओ –
प्रेमिका से भागने की फिराक में पति को पुत्र पत्नी ने लगाई पिटाई, वीडियो सोशल मीडिया पर वायरल।#Uttarakhand #India #UTTARAKHANDPOLICE pic.twitter.com/rJCQnBbj6M
— Ved Prakash Yadav (@VedPrak24293523) April 18, 2025
उधम सिंह नगरच्या बुधवारी दुपारी उधम सिंह नगरचे जिल्हा मुख्यालय असलेल्या रुद्रपूर सरकारी बस स्टँड परिसरात अचानक गोंधळ उडाला. पतीला जाब विचारात पत्नीला मारायला सुरुवात केली. परंतू नवऱ्याने बायकोवर हात उगारताच मुलाला आला राग आणि त्याने बापाला मारायला सुरुवात केली. प्रेयसीला चांगलाच प्रसाद मिळाला.
मुलाने सांगितले की या महिलेने माझ्या वडीलांना जाळ्यात ओढले आहे. त्या महिलेलाही तीन मुले आहेत. पहिल्या महिलेला घटस्फोट न देता त्या महिलेशी या इसमाने लग्नही केले होते. हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहून कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. या ठिकाणी जमलेल्या लोकांनी कसेतरी दोन्ही पक्षांना शांत केले. बाजार चौकीचे पोलीस अधिकारी जितेंद्र खत्री यांनी या दोघांना शांत करुन समज देऊन सोडून दिले आहे.