AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सिद्दिकी यांच्या घरी दाखल

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सिद्दिकी यांच्या घरी दाखल
baba siddiqui-zeeshan siddiqui
| Updated on: Apr 21, 2025 | 9:49 PM
Share

राष्ट्रवादीचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना धमकीचे ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गेल्यावर्षी कुख्यात बिश्नोई टोळीच्या गुंडांनी हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे पूत्र झिशान यांना संरक्षण देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांना धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.त्यामुळे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. झिशान सिद्दीकी यांना ईमेलवरुन जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर, पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

बाबा सिद्दिकी यांची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024  रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत हत्या केली होती. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात ते जात होते. तेव्हा खेरवाडी सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळीबार करीत त्यांची हत्या केली होती.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.