Sangli Crime : ट्रॅक्टरखाली येणाऱ्या मुलांना वाचवायला गेली, मुलं वाचली मात्र दुर्दैवाने स्वतःला वाचवू शकली नाही

| Updated on: Jan 12, 2023 | 8:05 PM

अचानक हा ट्रॅक्टर उतारावरुन पुढे सरकू लागला. संचिता यांचे पुढे सरकत असलेल्या ट्रॅक्टरकडे लक्ष गेले. ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर येईल या भीतीने त्या मुलांना वाचवण्यासाठी धावल्या.

Sangli Crime : ट्रॅक्टरखाली येणाऱ्या मुलांना वाचवायला गेली, मुलं वाचली मात्र दुर्दैवाने स्वतःला वाचवू शकली नाही
सांगलीत मुलांना वाचवायला गेलेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : ट्रॅक्टरखाली येणाऱ्या मुलांना वाचवायला गेलेल्या आईचा ट्रॅक्टरचा नांगर लागल्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगतील उघडकीस आली आहे. संचिता संपत पाटील असे मयत 28 वर्षीय आईचे नाव आहे. शिराळा तालुक्यातील तडवळे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूमुळे 2 वर्षे आणि 4 वर्षाची मुले अनाथ झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संचिता यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे, दोन दिर, जाऊबाई असा परिवार आहे. या घटनेची शिराळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

तडवळे गावात पाटील कुटुंबीय राहतात. मंगळवारी सायंकाळी संचिता या जनावरांच्या गोठ्यात साफसफाई करत होत्या. तर त्यांची दोन्ही मुलं बाहेर खेळत होती. गोठ्याच्या जवळच उतारावर ट्रॅक्टर उभा होता.

मुलांना वाचवायला गेल्या असता जखमी झाल्या

अचानक हा ट्रॅक्टर उतारावरुन पुढे सरकू लागला. संचिता यांचे पुढे सरकत असलेल्या ट्रॅक्टरकडे लक्ष गेले. ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर येईल या भीतीने त्या मुलांना वाचवण्यासाठी धावल्या.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान रुग्णालयात महिलेचा मृत्यू

यादरम्यान धावताना पाय घसरुन त्या पडल्या आणि ट्रॅक्टरचा नांगर त्यांना लागला. यात जखमी झालेल्या संचिता यांना तात्काळ इचलकरंजी येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र थोड्या वेळातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास हवालदार राजेंद्र माने हे करीत आहेत.