AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, इंजिनिअर तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून थायलंडमध्ये विकले

थायलंड येथे नोकरीचे आमीष दाखवून एका इंजिनिअर तरुणीला विकल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली आहे.

धक्कादायक, इंजिनिअर तरुणीला नोकरीचे आमीष दाखवून थायलंडमध्ये विकले
| Updated on: Oct 29, 2025 | 5:16 PM
Share

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या एका इंजिनियर तरुणीची फसवणूक करुन तिला ‘चॅटींग स्कॅम’ कंपनीला विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये दोन महिने अडकून पडलेल्या तरुणीने अखेर दोन हजार डॉलर्स भरुन स्वत:ची सुटका करुन घेतली. या तरुणीने भारतात परतल्यानंतर आरोपीविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील घटस्फोटीत २९ वर्षीय महिला नोकरीच्या शोधात शहरात आली होती. तक्रारदार तरुणी ही इलेक्ट्रीक इंजिनिअर आहे. वर्ष २०२१ मध्ये शहरातील लेडीज होस्टेलमध्ये राहत होती. तेव्हा तिने अॅग्रो केअर मशिनरीज या कंपनीत काम केले. यानंतर २०२५ मध्ये ती उल्कानगरी रोडवरील शंकरा रेसिडेन्सी येथील एफ व्होल्ट या कंपनीत नोकरीला लागली.तेथे काम करीत असताना कंपनीचे मालक अविनाश रामभाऊ उढाण सोबत ओळख झाली होती.तेव्हा त्याने थायलंड येथे मार्केटिंग मॅनेजरची नोकरी असल्याचे तिला सांगितले. तिच्याकडून दीड लाख रुपये घेतले आणि ऑगस्ट पहिल्या आठवड्यात तिला दिल्ली विमानतळावरुन थायलंड पाठवण्यात आले.

‘स्कॅमिंग’ काम करण्यासाठीच थायलंडला विक्री

ही महिला आधी बँकॉकला पोहोचली. तेथे हरप्रित सिंग हा तिला घेण्यासाठी आला होता. त्याने तिला कम्पोट गाती येथे (कम्बोडिया) टॅक्सीने क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत नेऊन सोडले. या कंपनीत तिच्याकडून स्कॅमिंगचे काम करून घेतले जात होते. उढाणने आपल्याला ‘स्कॅमिंग’ काम करण्यासाठीच थायलंडला विक्री केल्याची तिची खात्री झाली. यानंतर दोन महिन्यांनी संबंधित कंपनीला २ हजार अमेरिकन डॉलर भरून सुटका करून घेतली. कम्बोडिया येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने २१ ऑक्टोबर रोजी ती मुंबईला परतली. अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केल्याची तक्रार तिने नोंदवली आहे. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड आणि पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.