AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंबडी चोरायला तिघे आले होते, घराचा दरवाजा उघडा पाहून चोरटे घरात घुसले; तितक्यात तरुणाला जाग आली अन्…

बेकरीत काम करणारे तिघे जण गावात मध्यरात्री कोंबडी चोरायला आले होते. कोंबडी शोधत असताना त्यांची नजर एका घरावर गेली. त्या घराचा दरवाजा उघडा होता.

कोंबडी चोरायला तिघे आले होते, घराचा दरवाजा उघडा पाहून चोरटे घरात घुसले; तितक्यात तरुणाला जाग आली अन्...
पनवेलमध्ये कोंबडी चोरायला आलेल्या तिघांनी तरुणाला संपवलेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 03, 2023 | 6:08 PM
Share

नवी मुंबई / रवी खरात : कोंबडी चोरायला आलेल्या तिघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पनवेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र एका कोंबडीच्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांकडून एका तरुणाचा नाहक जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पनवेलमधील शिवकर गावात ही धक्कादायक घटना घडली.

कोंबडी चोरायला आले होते

शिवकर गावात रात्री दोन वाजता तिघे आरोपी कोंबडी चोरण्यासाठी आले होते. गावात घराबाहेर जाळीत ठेवलेल्या कोंबड्यांच्या शोधात आरोपी होते. याचवेळी एका घराचा दरवाजा चोरट्यांना उघडा दिसला. चोरट्यांनी दरवाजातून आत वाकून पाहिले असता आतील वस्तूंवर चोरट्यांची नजर पडली. चोरट्यांनी त्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात घरात झोपलेल्या 19 वर्षीय तरुणाला जाग आली. यामुळे चोरांनी तिथून पळ काढला. मात्र तरुणाने घरातील कुऱ्हाड घेऊन चोरट्यांचा पाठलाग केला. गावाबाहेर काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर तरुणाची चोरट्यांशी झटापट झाली. या झटापटीत चोरट्यांनी तरुणाच्या हातातली कुऱ्हाड घेऊन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी होऊन खाली पडल्याने चोरांनी तिथून पळ काढला.

घरच्यांनी शोधाशोध केली असता गावाबाहेर जखमी अवस्थेत आढळला तरुण

काही उशिराने घरातील इतर सदस्यांना जाग आली. त्यांनी विनय याला शोधण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध केल्यानंतर गावाबाहेर गंभीर जखमी अवस्थेत तरुण सापडला. त्यांनी तरुणाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी वेगाने तपास करत तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा