कोंबडी चोरायला तिघे आले होते, घराचा दरवाजा उघडा पाहून चोरटे घरात घुसले; तितक्यात तरुणाला जाग आली अन्…

| Updated on: Apr 03, 2023 | 6:08 PM

बेकरीत काम करणारे तिघे जण गावात मध्यरात्री कोंबडी चोरायला आले होते. कोंबडी शोधत असताना त्यांची नजर एका घरावर गेली. त्या घराचा दरवाजा उघडा होता.

कोंबडी चोरायला तिघे आले होते, घराचा दरवाजा उघडा पाहून चोरटे घरात घुसले; तितक्यात तरुणाला जाग आली अन्...
पनवेलमध्ये कोंबडी चोरायला आलेल्या तिघांनी तरुणाला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

नवी मुंबई / रवी खरात : कोंबडी चोरायला आलेल्या तिघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना पनवेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र एका कोंबडीच्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांकडून एका तरुणाचा नाहक जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पनवेलमधील शिवकर गावात ही धक्कादायक घटना घडली.

कोंबडी चोरायला आले होते

शिवकर गावात रात्री दोन वाजता तिघे आरोपी कोंबडी चोरण्यासाठी आले होते. गावात घराबाहेर जाळीत ठेवलेल्या कोंबड्यांच्या शोधात आरोपी होते. याचवेळी एका घराचा दरवाजा चोरट्यांना उघडा दिसला. चोरट्यांनी दरवाजातून आत वाकून पाहिले असता आतील वस्तूंवर चोरट्यांची नजर पडली. चोरट्यांनी त्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात घरात झोपलेल्या 19 वर्षीय तरुणाला जाग आली. यामुळे चोरांनी तिथून पळ काढला. मात्र तरुणाने घरातील कुऱ्हाड घेऊन चोरट्यांचा पाठलाग केला. गावाबाहेर काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर तरुणाची चोरट्यांशी झटापट झाली. या झटापटीत चोरट्यांनी तरुणाच्या हातातली कुऱ्हाड घेऊन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी होऊन खाली पडल्याने चोरांनी तिथून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

घरच्यांनी शोधाशोध केली असता गावाबाहेर जखमी अवस्थेत आढळला तरुण

काही उशिराने घरातील इतर सदस्यांना जाग आली. त्यांनी विनय याला शोधण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध केल्यानंतर गावाबाहेर गंभीर जखमी अवस्थेत तरुण सापडला. त्यांनी तरुणाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी वेगाने तपास करत तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.