Solapur Youth Murder : गड्डा यात्रेत पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

सोलापूर शहरात गड्डा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत आठ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून काही नागरिक आणि पीडित यांच्यात वादादवादी झाली. या वादावादीचे हाणामारीत पर्यावसन झाले.

Solapur Youth Murder : गड्डा यात्रेत पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद, जीवघेण्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
सोलापुरात पैशाच्या वादातून तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 19, 2023 | 5:33 PM

सोलापूर : गड्डा यात्रेत पैशाच्या देवाण घेवाणीवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत तरुणाचा मृतेदह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सर्व पीडित आणि जखमी मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले आहेत. पोलिसात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आठ हजाराच्या देवाण-घेवाणीवरुन झाला वाद

सोलापूर शहरात गड्डा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत आठ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून काही नागरिक आणि पीडित यांच्यात वादादवादी झाली. या वादावादीचे हाणामारीत पर्यावसन झाले.

टोळक्याकडून तिघांवर जीवघेणा हल्ला

दरम्यान आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गड्डा यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मार्केट पोलीस चौकीच्या समोरील बाजूस दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी तिघांवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. शहरातील मार्केट पोलीस चौकीसमोरच ही घटना घडली.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसेच जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत असून याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.